हा ‘राष्ट्रवादी’चा गट नव्हे तर ‘ईडी गट’, रात्री चांगली झोप लागावी म्हणूनच ते भाजपसोबत : पृथ्वीराज चव्हाण

हा ‘राष्ट्रवादी’चा गट नव्हे तर ‘ईडी गट’, रात्री चांगली झोप लागावी म्हणूनच ते भाजपसोबत : पृथ्वीराज चव्हाण
Published on
Updated on

कराड, पुढारी वृत्तसेवा : पुढील महिन्यात १० ऑगस्ट पूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांना निर्णय घ्यावा लागणार आहे. हा निर्णय काय असेल हे सूर्य प्रकाशाइतके स्पष्ट असल्याने आता पुढील महिन्यात रिक्त होणाऱ्या मुख्यमंत्री पदाची पूर्वतयारी केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधून जो गट फुटला आहे, त्या गटावर ईडीची छत्रछाया होती. त्यामुळे या फुटीर गटाला राष्ट्रवादीचा गट नाही तर ईडी गट असे मानतो. अजित पवार यांच्यासोबत ३६ हून अधिक आमदार नसतील, तर अजित पवार यांच्यासह फुटीर गट अपात्रतेच्या कचाट्यात सापडेल, असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भोपाळमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार सुप्रिया सुळे यांचा नाम उल्लेख करत ७० हजार कोटींच्या घोटाळ्याबाबत केले होते. त्यानंतर दोनच दिवसात राष्ट्रवादीमध्ये फूट पडून अजित पवार व छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली एक गट भाजपसोबत गेला. ज्या लोकांवर गंभीर आरोप आहेत त्यांना मंत्रीपदे बहाल केली असून हा राजकारणातील विरोधाभास आहे. ज्यांच्यावर ईडीची छत्रछाया होती, ते सर्वजण रात्री चांगली झोप लागावी म्हणून भाजपसोबत गेल्याचा टोला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी लगावला.

अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीचा एक गट भाजपसोबत गेला असला तरी राज्यात महाविकास आघाडी सर्व शक्तीनिशी जातीवादी पक्षांच्या विरोधात ठामपणे लढणार असल्याचा विश्वास चव्हाण यांनी व्यक्त केला. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीतील ३६ हून अधिक आमदार असणे आवश्यक आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभेतील एकूण संख्या ५३ आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत अनेक आमदारांनी संपर्क सादर आपण पक्षासोबत असल्याचे सांगितले की लक्षात आणून देत जर खासदार शरद पवार यांच्यासोबत वीस आमदार ठामपणे उभे राहिले तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याप्रमाणेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह त्यांच्या सर्व सहकाऱ्यांवर अपात्रतेची टांगती तलवार असेल, असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.

हेही वाचलंत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news