G7 Summit 2023 : पंतप्रधान नरेंद्र मोदी हिरोशिमाला रवाना, G-7 परिषदेत सहभागी होणार

G7 Summit 2023 : पंतप्रधान नरेंद्र मोदी हिरोशिमाला रवाना, G-7 परिषदेत सहभागी होणार
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्या निमंत्रणावरून जपानच्या अध्यक्षतेखालील जी 7 शिखर परिषदेला उपस्थित राहण्यासाठी हिरोशिमा, जपानला रवाना झाले आहेत. परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी खूप उत्सुक आहेत. त्यांनी जपानला रवाना होण्यापूर्वी  ट्विट करुन माहिती दिली आणि या परिषदेबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. वाचा सविस्तर बातमी. (G7 Summit 2023)

G7 Summit 2023 : आजपासून जी-7 सदस्य देशांची बैठक 

जपानच्या हिरोशिमा शहरात आजपासून (दि.१९) जी-7 सदस्य देशांची बैठक सुरू होणार आहे. दक्षिण चिनी समुद्रासह हिंद महासागरातील चीनच्या विस्तारवादाविरुद्ध तसेच वाढत्या आर्थिक प्रभावाविरुद्ध या बैठकीत धोरण आखले जाईल. सर्व देश मिळून एक संयुक्त निवेदनही जारी करतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी य़ांनी ट्विट करत या परिषदेच्या उपस्थितीबद्दल सांगितले. ते म्हणाले की," या जी-7 शिखर परिषदेत माझी उपस्थिती विशेष अर्थपूर्ण असणार आहे. कारण यावर्षी जी20 चे अध्यक्षपद भारताकडे आहे. मी जी-7 देश आणि इतर आमंत्रित भागीदारांसोबत जगासमोरील आव्हाने आणि त्यांना एकत्रितपणे हाताळण्याची गरज यावर विचारांची देवाणघेवाण करण्यास उत्सुक आहे. हिरोशिमा जी-7 शिखर परिषदेत सहभागी होणाऱ्या काही नेत्यांसोबत मी द्विपक्षीय बैठकाही घेणार आहे.

भारतीय पंतप्रधानांची पापुआ न्यू गिनीची पहिलीच भेट

पंतप्रधान आपल्या पुढील ट्वीटमध्ये म्हणाले की,"जपानमधून , मी पोर्ट मोरेस्बी, पापुआ न्यू गिनीला भेट देणार आहे. ही माझी पहिलीच भेट असेल, तसेच कोणत्याही भारतीय पंतप्रधानांची पापुआ न्यू गिनीचीला पहिलीच भेट असेल. मी 22 मे 2023 रोजी पापुआ न्यू गिनीचे पंतप्रधान जेम्स मारापे यांच्यासमवेत भारत-पॅसिफिक आयलँड्स कोऑपरेशन (FIPIC III समिट) ची तिसरी शिखर परिषद संयुक्तपणे आयोजित करीन.

सर्व 14 पॅसिफिक बेट देशांनी (PIC) या महत्त्वपूर्ण शिखर परिषदेला उपस्थित राहण्याचे आमंत्रण स्वीकारले याबद्दल मी कृतज्ञ आहे. 2014 मध्ये माझ्या फिजीच्या भेटीदरम्यान FIPIC लाँच करण्यात आले होते आणि हवामान बदल आणि शाश्वत विकास, क्षमता निर्माण आणि प्रशिक्षण, आरोग्य आणि कल्याण, पायाभूत सुविधा आणि आम्हाला एकत्र आणणार्‍या मुद्द्यांवर PIC नेत्यांशी संवाद साधण्यासाठी मी उत्सुक आहे.

G7 Summit 2023 : सिडनी येथे जाणार

पंतप्रधान अल्बानीज यांच्या निमंत्रणावरून मी ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे जाणार आहे. मी आमच्या द्विपक्षीय बैठकीची आतुरतेने वाट पाहत आहे, जी आमच्या द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेण्याची आणि या वर्षी मार्चमध्ये नवी दिल्ली येथे झालेल्या आमच्या पहिल्या भारत-ऑस्ट्रेलिया वार्षिक शिखर परिषदेचा पाठपुरावा करण्याची संधी असेल. मी ऑस्ट्रेलियन सीईओ आणि व्यावसायिक नेत्यांशी देखील संवाद साधेन आणि एका विशेष कार्यक्रमात सिडनीमधील भारतीय समुदायाला भेटेन.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news