PM Modi: मानवतेच्या कल्याणासाठी वैज्ञानिकांचे अथक प्रयत्न सुरूच राहतील: इस्त्रोच्या संशोधकांचे पंतप्रधानांकडून अभिनंदन

PM Modi
PM Modi

पुढारी ऑनलाईन डेस्क: भारताची पहिली सौर मोहीम आदित्य -L1 च्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी इस्त्रोमधील (ISRO) शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांचे अभिनंदन केले आहे. संपूर्ण मानवतेच्या कल्याणासाठी आमच्या वैज्ञानिकांचे अथक प्रयत्न सुरूच राहतील, असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करून व्यक्त केला आहे. (PM Modi)

चांद्रयान-3'च्या अभूतपूर्व यशानंतर आता भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच 'इस्रो'कडून सूर्याचा अभ्यास करण्यासाठी 'आदित्य एल-1' ही मोहीम राबवण्यात येत आहे.  आज (दि. 2) सकाळी 11 वाजून 50 मिनिटांनी येथील सतीश धवन केंद्रातून 'आदित्य एल-1'चे प्रक्षेपण करण्यात आले. आदित्य-L1 ही भारताची पहिली आणि जगातील 23 वी सौर मोहीम आहे.

PM Modi : भारताचे आदित्य-L1 म्हणजे काय?

आदित्य एल1 हे सूर्याचा अभ्यास करण्याचे मिशन आहे. यासोबतच इस्रोने याला पहिली अंतराळ-आधारित वेधशाळा श्रेणी भारतीय सौर मोहीम म्हटले आहे. पृथ्वीपासून अंदाजे 1.5 दशलक्ष किमी अंतरावर असलेल्या सूर्य-पृथ्वी प्रणालीच्या Lagrangian पॉइंट 1 (L1) भोवती हेलो ऑर्बिटमध्ये यान ठेवण्याची योजना आहे.

आदित्य L-1 सौर कोरोनाची रचना (सूर्याच्या वातावरणाचा सर्वात बाहेरील भाग) आणि त्याची गरम प्रक्रिया, त्याचे तापमान, सौर उद्रेक आणि सौर वादळांची कारणे आणि उत्पत्ती, कोरोनाची रचना, वेग आणि घनता आणि कोरोनल लूप प्लाझ्मा, गुणधर्म हे चुंबकीय क्षेत्र मोजेल, कोरोनल मास इजेक्शनची उत्पत्ती, उत्क्रांती आणि गतीचा अभ्यास करेल (सूर्यमधील सर्वात शक्तिशाली स्फोट जे थेट पृथ्वीच्या दिशेने येतात), सौर वारे आणि अंतराळ हवामानावर परिणाम करणारे घटक.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news