इलेक्ट्रिक वाहनांच्या किंमती आता होणार कमी

E-vehicles
E-vehicles
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा

इलेक्ट्रिक वाहने तुमचा पेट्रोलचा खर्च वाचवतात, परंतु या वाहनांची मुळ किंमत जास्त असते. सध्या इ-बाईक्स किंवा इ-कार यांमध्ये असणाऱ्या तंत्रज्ञानामुळे त्यांची किंमत जास्त असते. त्याचबरोबर खराब आणि कमी चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर देखील इलेक्ट्रिक वाहने खरेदी न करण्या मागचे एक कारण आहे. परंतु, आयआयटी संशोधकांनी इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जरसाठी एक विशेष तंत्रज्ञान विकसित केले आहे, ज्यामुळे भविष्यात इलेक्ट्रिक वाहनांची किंमत कमी होऊ शकते आणि या वाहनांच्या निर्मात्यांना इलेक्ट्रिक वाहनांची मुळ किंमत कमी ठेवणे शक्य होईल.

आयआयटीच्या संशोधकांचा अहवाल

संशोधकांनी यासंदर्भात दिलेल्या अहवालात म्हटले आहे की आयआयटी (BHU) वाराणसी, आयआयटी गुवाहाटी आणि आयआयटी भुवनेश्वर यांनी संयुक्तपणे ऑन बोर्ड चार्जरसाठी एक विशेष तंत्रज्ञान विकसित केले आहे. ज्यामध्ये प्रोपल्शन मोडसाठी वापरल्या जाणार्‍या अतिरिक्त पॉवर इलेक्ट्रॉनिक इंटरफेसची आवश्यकता नसेल. यामुळे चार्जरमधील एक मोठा घटक कमी झाल्याने कंपन्या कारची किंमत कमी ठेवू शकतील. या अहवालानुसार तंत्रज्ञान विकसित करणार्‍या टीमचे म्हणणे आहे की आयआयटी (BHU) वाराणसीमध्ये लॅब स्केल विकसित केले असून आता त्याचे अपग्रेडेशन आणि व्यावसायिकीकरणाची प्रक्रिया चालू आहे.

आईसी इंजिन हा एक उत्तम पर्याय

आयआयटी बीएचयूचे मुख्य प्रकल्प अन्वेषक राजीव कुमार सिंह म्हणाले, देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमती सर्वसामान्यांसाठी चिंताजनक आहेत. पेट्रोलियम उत्पादनांच्या वाढत्या किंमती आणि प्रदूषणाची वाढती पातळी पाहता, इलेक्ट्रिक वाहनांमधील पारंपारिक आईसी इंजिन हा एक उत्तम पर्याय आहे. हाय पॉवर ऑफ बोर्ड चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चरचा अभाव असल्यामुळे वाहन निर्मात्यांना वाहनांमध्येच ऑनबोर्ड चार्जर समाविष्ट करावा लागतो. या वाहनांचे मालक त्यांची वाहने आउटलेटमधून चार्ज करतात आणि यामुळे इलेक्ट्रिक वाहने खूप महाग होत आहेत.

सिंह म्हणतात की संशोधकांनी एक ऑनबोर्ड चार्जर तंत्रज्ञान सादर केले आहे. जे प्रोपल्शन मोडसाठी आवश्यक असलेल्या अतिरिक्त पॉवर इलेक्ट्रॉनिक्स इंटरफेसची आवश्यकता दूर करेल आणि त्यात समाविष्ट असलेले घटक 50% पर्यंत कमी करेल. हे चार्जर अशा प्रकारे सेट केले जाऊ शकते की ते चार्जिंग मोडसाठी चार्जर आणि प्रोपल्शन मोडसाठी इन्व्हर्टर म्हणून काम करू शकते.

या तंत्रज्ञानामुळे ऑनबोर्ड चार्जरची किंमत सध्याच्या चार्जर्सच्या तुलनेत सुमारे 40-50% कमी होईल. चार्जरची किंमत कमी केल्याने भविष्यात इलेक्ट्रिक वाहनांची किंमतही कमी होईल, असेही सिंह म्हणाले.

टीमचे म्हणणे आहे की देशातील एका मोठ्या इलेक्ट्रिक वाहन उत्पादकाने या तंत्रज्ञानामध्ये रस दाखवला आहे आणि आता ही कंपनी तंत्रज्ञानाचे व्यावसायिक उत्पादन (प्रॉडक्ट) विकसित करणार आहे, जे सध्याच्या इलेक्ट्रिक वाहनांमध्ये बसविले जाऊ शकते. परंतु, टीमने या कंपनीचे नाव सांगण्यास नकार दिला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news