मेडिकल प्रिस्क्रिप्शन, पोस्‍टमॉर्टम रिर्पाट सुवाच्‍य हस्‍ताक्षरात लिहा : ओडिशा उच्‍च न्‍यायालयाचे निर्देश

प्रातिनिधिक छायाचित्र.
प्रातिनिधिक छायाचित्र.

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : वेडेवाकडे लिहिण्‍याची डॉक्‍टरांमध्‍ये फॅशनच बनली आहे. पोस्टमॉर्टम रिपोर्ट ( शवविच्छेदन अहवाल) लिहिताना बहुतेक डॉक्टरांचा "चलता है ' असा दृष्टीकोन वैद्यकीय-कायदेशीर कागदपत्रांच्या आकलनावर वाईट रीतीने परिणाम करत आहे. त्‍यांनी लिहिलेले मजकूर सामान्‍य माणूस असो की, न्‍यायिक अधिकारी वाचू शकत नाही, असे निरीक्षण नोंदवत मेडिकल प्रिस्‍क्रिप्‍शन (औषध चिठ्ठी ) Medical prescription असो की वैद्यकीय-कायदेशीर दस्तऐवज पोस्टमॉर्टम रिर्पाट हे सुवाच्‍य हस्‍ताक्षरातच लिहिली पाहिजेत, असे निर्देश नुकतेच ओडिशा उच्‍च न्‍यायालयाने राज्‍याच्‍या मुख्‍य सचिवांना दिले. (prescriptions, postmortem reports in legible handwriting: Orissa High Court )

मुलाचा सर्पदंशाने मृत्‍यू झाला. मात्र त्‍याला नुकसान भरपाईस राज्‍य सरकारने नकार दिला होता. याविरोधात पित्‍याने ओडिशा उच्‍च न्‍यायालयात याचिका दाखल केली होती. यावर न्‍यायमूर्ती एस. के. पाणिग्रही यांच्‍या एकल खंडपीठासमोर सुनावणी झाली.

Medical prescription : न्यायालयांमधील पुराव्याच्या गुणवत्तेवर परिणाम होतो

या प्रकरणातील पोस्टमॉर्टम रिपोर्ट ( शवविच्छेदन अहवाल) अहवाल समजू शकला नाही. त्‍यामुळे संबंधित डॉक्‍टरांनी न्‍यायालयात हजर राहावे, असे आदेश न्‍यायालयाने दिले होते. यावेळी न्‍यायमूर्ती एस. के. पाणिग्रही यांनी स्‍पष्‍ट केले की, डॉक्टरांचे असे लिखाण सामान्य वाचनात समजू शकत नाही. स्‍वत: डॉक्‍टर किंवा हस्तलेखन तज्ञांना अशा रिपोर्टचे आमंत्रित करावे लागते. पोस्टमॉर्टम रिपोर्ट लिहिताना बहुतेक डॉक्टरांचा "चलता है ' असा दृष्टीकोन वैद्यकीय-कायदेशीर कागदपत्रांच्या आकलनावर वाईट रीतीने परिणाम करत आहे. त्‍यामुळे न्यायिक व्यवस्थेला निश्चित निष्कर्षापर्यंत पोहोचणे कठीण जात आहे, असेही न्‍यायालयाने स्‍पष्‍ट केले. ( prescriptions, postmortem reports in legible handwriting: Orissa High Court )

डॉक्‍टरांनी चांगल्‍या हस्‍ताक्षरात Medical prescription  लिहिणे आवश्‍यक

वैद्यकीय-कायदेशीर समस्या हाताळताना अत्यंत खराब हस्ताक्षरात डॉक्‍टर सहजतेने लिहित आहेत. त्यांनी त्यांची वृत्ती बदलणे आवश्यक आहे. त्‍यांनी मोठ्या अक्षरात किंवा टाईप केलेल्या स्वरूपात किंवा चांगल्या हस्ताक्षरात लिहिणे आवश्यक आहे जेणेकरून न्यायालयीन व्यवस्थेला त्यांचे हस्ताक्षर वाचण्यात अनावश्यक थकवा येत नाही, असेही न्‍यायमूर्ती एस. के. पाणिग्रही यांनी नमूद केले.

परिपत्रक जारी करण्याचे मुख्‍य सचिवांना आदेश

राज्याच्या मुख्य सचिवांनी सर्व वैद्यकीय केंद्रे, खाजगी दवाखाने आणि वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांना एक परिपत्रक जारी करण्याचे निर्देशही दिले आहेत ज्यात त्यांना औषध लिहून देताना योग्य हस्ताक्षरात किंवा टाइप केलेल्या स्वरूपात लिहिण्याचे निर्देश दिले आहेत.

प्राधिकरणाकडून नुकसान भरपाई मिळविण्याचे निर्देश

यावेळी खंडपीठाने याचिकाकर्त्याला सर्पदंश प्रकरणी विहित केलेला फॉर्म भरून तहसीलदाराकडे सादर करण्‍याचे. तसेच योग्य प्राधिकरणाकडून नुकसान भरपाई मिळविण्याचे निर्देश देत ही याचिका निकाला काढली.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news