कोल्ड्रिंकऐवजी हेल्दी ड्रिंकला द्या प्राधान्य, वाढत्या उन्हामुळे तज्ज्ञाचा सल्ला

कोल्ड्रिंकऐवजी हेल्दी ड्रिंकला द्या प्राधान्य, वाढत्या उन्हामुळे तज्ज्ञाचा सल्ला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शहराचे तापमान दिवसेंदिवस वाढतच आहे. उन्हाच्या झळांमुळे बाहेर पडायची इच्छा नसली तरी नोकरी, कामानिमित्त उन्हात बाहेर पडावेच लागते. अशावेळी कोल्डड्रिंकचा आधार न घेता घरगुती शरीराला कूल ठेवणारे हेल्दी कूलर्स म्हणजेच आरोग्यदायी पेय पिण्याचा सल्ला तज्ज्ञ देत आहेत.

उन्हाळा म्हटला की, थंड पिण्याची इच्छा होतेच. उन्हामुळे शरीरातील ऊर्जा कमी झाल्याने तहान लागल्यावर थंड पेय पिण्यास प्राधान्य दिले जाते. पण हे कोल्डड्रिंक पिण्याची सवय महागात पडू शकते. कोल्डड्रिंकमध्ये साखरेचे प्रमाण अधिक असल्याने शरीरातील ग्लुकोजचे प्रमाण वाढते. लठ्ठपणाच्या समस्येला तोंड द्यावे लागते. नियमित कोल्डड्रिंक पिल्याने पचनशक्ती बिघडून, अपचन, डोकेदुखी, भूक मंदावणे, हार्माेनल इनबॅलन्ससारख्या अनेक समस्या निर्माण होतात. कोल्डड्रिंकमध्ये दोन प्रकारची साखर असते. ग्लुकोज आणि फ्रुक्टोज. पैकी ग्लुकोज शरीरात त्वरित शोषले जाते आणि चयापचय होते. दुसरीकडे फ्रुक्टोज केवळ यकृतामध्ये साठवले जाते. अशा परिस्थितीत नियमित कोल्डड्रिंक प्यायल्याने यकृतामध्ये फ्रुक्टोज जास्त प्रमाणात जमा होऊन यकृताशी संबंधित समस्या निर्माण होतात.

एनर्जी ड्रिंक प्या

आरोग्यदायी पेय पिल्याने शरीराला तरतरी येते. शिवाय दोन जेवणाच्यामध्ये शरीराला एनर्जी देणारे कूलर्स म्हणजे थंड पेय जास्त गरजेची असतात. चिंच गुळाचं पन्हं, कैरीचे पन्हं, संत्रीचे सरबत, सत्तूचे सरबत, सत्तूचा मिल्कशेक, टोमॅटो आणि काकडी, जिंजरेल, ताक, लस्सी, मठ्ठा, लिंबू सरबत सारखे घरगुती आरोग्यदायी पेय पिल्याने उन्हाशी सामना करायला शरीर तयार राहते.

उन्हातून आल्यानंतर शरीराचा विचार न करता कोल्डड्रिंक पिऊन लोक मोकळी होतात. पण एक ग्लास कोल्डड्रिंकमध्ये आठ-नऊ चमचे साखर म्हणजेच जवळपास १५० कॅलरीज असतात. आरोग्याचा विचार करून कोल्डड्रिंक पिणे टाळा आणि आरोग्यदायी पेय पिण्यास प्राधान्य द्या.
– डॉ. नितीन चौधरी.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news