श्रीरामपूर भाजपकडून ‘द केरला स्टोरी’ चित्रपट मोफत | पुढारी

श्रीरामपूर भाजपकडून ‘द केरला स्टोरी’ चित्रपट मोफत

श्रीरामपूर : पुढारी वृत्तसेवा : युवती व महिलांमध्ये जनजागृती करण्यासाठी ‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट श्रीरामपूर भाजपकडून मोफत दाखविण्यात आला. अहमदनगर जिल्ह्यातून गेल्या पाच महिन्यांमध्ये तब्बल 2200 मुली बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती समोर आल्याने खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर चित्रपट दाखविल्याचे भाजप पदाधिकारी म्हणाले. भाजपचे जिल्हा संघटन मंत्री, महाराष्ट्राचे प्रवक्ते नितीनदिनकर यांच्या नेतृत्वाखाली राबविलेल्या या उपक्रमास जिल्हा उपाध्यक्ष सतीश सौदागर, सांस्कृतिक सेलचे जिल्हाध्यक्ष बंडूकुमार शिंदे, तालुका उपाध्यक्ष शंकर मुठे, युवा मोर्चा शहराध्यक्ष रुपेश हरकल, महिला मोर्चा शहराध्यक्षा पूजा चव्हाण, सुप्रिया धुमाळ, पुष्पा हरदास, अनिता शर्मा, जयश्री थोरात, सुवर्णा अधिक, सपना थेटे, सरोदे, ओझा, बाळासाहेब हरदास, विशाल अंभोरे, निलेश गिते, सुबोध शेवतेकर, अजय जनवेजा, रुद्र प्रताप कुलकर्णी, प्रथमेश जोशी, प्रसाद वैद्य, किरण शिंदे, सुजित तनपुरे, प्रतीक लगे, मनीष कुलकर्णी, लहू खंडागळे, अमोल मिसाळ, किरण शेळके, आकाश पंडित, भावेश भवर, पंकज करमासे, शुभम कोरडेंसह युवा, महिला मोर्चाचे पदाधिकारी, हिंदू मुली व महिला उपस्थित होत्या. चित्रपटाचे आयोजक संघटन मंत्री नितीन दिनकर यांनी चित्रपट मोफत उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले.

मुली व महिलांनी पाहिला चित्रपट
श्रीरामपूर तालुक्यात लव -जिहादची प्रकरणे वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपा युवा, महिला मोर्चासह सांस्कृतिक सेलच्या वतीने हिंदू मुली व महिलांमध्ये जनजागृती करण्यासाठी धर्मांतराच्या घटनेवर आधारित असलेला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट मोफत उपलब्ध करण्यात आला. शेकडो हिंदू मुली व महिलांनी या चित्रपटाचा आनंद लुटला.

Back to top button