Potato Pudding : श्रावण विशेष रेसिपी- उपवासासाठी बनवा स्वीट बटाट्याचे पुडिंग

Potato Pudding
Potato Pudding

पुढारी ऑनलाईन डेस्क : व्रत- वैकल्याचा म्हणजे, श्रावण महिना सुरू आहे. या महिन्यात खास करून स्त्रिया आणि मुली भगवान शंकराची पुजा करतात. या व्रतादरम्यान केल्या जाणाऱ्या उपवासाचेही महत्व अधिक आहे. सामान्य महिला उपवासासाठी नेहमी फक्त साबुदाण्याची खिचडी, केळाचे वेफर्स आणि गोड शाबूचिवडा किंवा तिखट शाबूचिवडाच खातात. या पदार्थासोबतच श्रावणात उपवासाला स्पेशल बटाट्याचे पुडिंग ट्राय करा. बटाटे बाजारात ताबोडतोब मिळतात. शिवाय सर्वसामान्याला परवडणारे असल्याने घरच्या घरी नक्की करून बघा स्वीट बटाट्याचे पुडिंग. यामुळे स्पेशल उपवासासाठी बटाट्याचे पुडिंग कसे बनवावे? हे जाणून घ्या… (Potato Pudding )

बटाट्याच्या पुडिंगसाठी लागणारे साहित्य

५०० ग्रॅम बटाटे
२५० ग्रॅम साखर
१०० ग्रॅम खवा
अर्धी वाटी तूप
२-३ वेलदोडे पूड
थोडे केशर
१ वाटी ओले खोबरे
बदाम
काजू

बटाट्याचे पुडिंग करण्याची कृती

पहिल्यांदा केशर वारीक करून गरम पाण्यात थोड्या वेळापर्यंत भिजत ठेवावे.

५०० ग्रॅम बटाटे उकडून ते सोलावे व गरमच असताना पुरणयंत्रात घालून बारीक करावे किंवा किसणीने बारीक किसावे.

२५० ग्रॅम साखरेत अर्धा वाटी पाणी घालून ते गॅसवर ठेवावे व दोनतारी येईपर्यंत पाक तयार करावा.

यानंतर एका जाड पातेल्यात तूप तापले की, त्यावर बटाट्याचे हे मिश्रण ओतावे.

भिजलेले केशर पाकात घालावे व पाक बटाट्याच्या मिश्रणात ओतावा.

यानंतर खवा वारीक कुस्करून त्यात घालावे आणि मिश्रण एकजीव होईपर्यत सतत ढवळावे.

यानंतर हे मिश्रण खाली उतरवून पसरट ( सुबकशा) भाड्यात घालावे. यावर वेलदोडे पूड, बदाम, काजू आणि थोडे ओले खोबरे घालावे.

यानंतर तयार होईल बटाट्याचे पुडींग. (Potato Pudding )

हे बटाट्याचे पुडींग खास उपवासादिवशी नक्की ट्राय करा…

हेही वाचलंत का? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news