Singer KK Death : गायक केके यांचा मृत्यू नैसर्गिकच; पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट

Singer KK Death : गायक केके यांचा मृत्यू नैसर्गिकच; पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट

कोलकाता; पुढारी ऑनलाईन : प्रसिध्द पार्श्वगायक केके उर्फ कृष्णकुमार कुन्नथ (Singer KK Death) यांचे मंगळवारी रात्री निधन झाले. पण त्यांचा मृत्यू हा अनैसर्गिक असल्याची शक्यता वर्तवली जात होती. कोलकाता येथील एसएसकेएम रुग्णालयात केके यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. शवविच्छेदन अहवालात त्यांच्या अनैसर्गिक मृत्यूची शक्यता नाकारण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्या मृत्यूबाबत निर्माण झालेला संभ्रम आता दूर करण्यात आलेला आहे.

मंगळवारी (दि.३१) रात्री प्रसिद्ध गायक केके (Singer KK Death) यांचा ह्दयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. कोलकाता येथील गुरुदास महाविद्यालयाच्या फेस्टिव्हलमध्ये त्यांचा लाईव्ह कॉन्सर्ट होता. हा कॉन्सर्ट संपवून ते आपल्या हॉटेलमध्ये पोहचले. यावेळी ह्रदयविकाराच्या धक्क्याने खाली कोसळले. त्यांना तातडीने सीएमआरआय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

यावेळी केके (Singer KK Death) यांच्या मृत्यूबाबत संदिग्धता व्यक्त करण्यात आली होती. त्यांच्या डोके, चेहरा आणि ओठावर जखमा आढळून आल्या होत्या. त्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आल्यावर मात्र त्यांच्या अनैसर्गिक मृत्यूची शक्यता नाकारण्यात आली आहे. त्यामुळे केके यांचा मृत्यू नैसर्गिकच असल्याचे शवविच्छेदन अहवालाद्वारे आता स्पष्ट झाले आहे.

पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट

शवविच्छेदनात गायक केके यांचा अनैसर्गिक मृत्यू झाल्याचे नाकारण्यात आले आहे. तीव्र ह्दयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाल्याचे अहवालात सांगिण्यात आले आहे. तसेच त्यांना जुन्या यकृत आणि फुफ्फुसाच्या गंभीर आजाराने ग्रासले होते, असे अहवालात नमुद करण्यात आले आहे.

त्यांच्या मृत्यूपूर्वी या प्रसिद्ध गायकाने मंचावर जोरदार परफॉर्मन्स दिला. या कॉन्सर्टचे व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आता एका प्लेलिस्टचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही प्लेलिस्ट त्याच स्टेजवर पडली आहे, ज्यावर KK (KK last show) यांनी शेवटचा परफॉर्मन्स दिला होता. यामध्ये एकूण १८ गाणी आहेत. जे बहुधा केके यांनी स्वतःच्या हातांनी लिहिले आहे. अशाप्रकारे प्लेलिस्टचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news