Sourav Ganguly Resigns : सौरव गांगुलीने दिला बीसीसीआय अध्यक्षपदाचा राजीनामा; नव्या कारकिर्दीचे दिले संकेत | पुढारी

Sourav Ganguly Resigns : सौरव गांगुलीने दिला बीसीसीआय अध्यक्षपदाचा राजीनामा; नव्या कारकिर्दीचे दिले संकेत

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताचा माजी कर्णधार तथा बीसीसीआयचे अध्यक्ष (BCCI) सौरव गांगुली (Sourav Ganguly Resigns) याने बीसीसीआय अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.  सौरव गांगुली याने केलेल्या ट्वीटद्वारे या चर्चेला उधाण आले आहे. त्याच्या या निर्णयामुळे आणि ट्वीटने सर्वांनाचा धक्का दिला आहे. या बाबत ट्वीट करत सौरव गांगुली म्हणाला, आपण एक नवी इंनिग सुरु करत असून याद्वारे पुन्हा एकदा अनेकांची मदत करणे शक्य होईल. या  निर्णयात देखिल आपली साथ अशीच लाभेल अशी आशा त्याने ट्वीटद्वारे व्यक्त केली आहे.

भारताचा आक्रमक सलामीवीर तथा सर्वात पहिला यशस्वी कर्णधार म्हणून सौरव गांगुलीला (Sourav Ganguly Resigns) ओळखले जाते. त्याने मैदानावर जसे नाव गाजवले त्याप्रमाणेच त्याने मैदानाच्या बाहेर बीसीसीआयचा अध्यक्ष म्हणून देखिल त्याने उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. आपल्या रोखठोक भूमिकेमुळे गांगुली नेहमी चर्चेत राहिला आहे. यावेळी देखिल सौरव गांगुलीने आपल्या निर्णयाने पुन्हा एकदा सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.

सौरव गांगुली (Sourav Ganguly Resigns) याने मी अशी काही वेगळी योजना आखत जी अनेकांना सहाय्यक ठरेल. मला अशा आहे की मी माझ्या जीवनात या नव्या अध्यायाला सुरुवात केल्यावर पुर्वी प्रमाणेच आपली साथ लाभेल. या ट्विटनंतर सौरव गांगुलीच्या राजीनाम्याची चर्चा सुरु झाली आहे. या ट्विटमध्ये त्याने आपल्या मागील ३० वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीचा आढावा घेतला आहे. तसेच त्याने क्रिकेटने व क्रीडा रसिकांनी आपणास भरपूर काही दिले असल्याची भावना व्यक्त केली आहे.

तर सौरव गांगुली यांनी अद्याप बीसीसीआयचा राजनीमा दिला नसल्याचे बीसीसीआयचे उपाध्यक्ष जय शहा यांनी एएनआय वृत्तसंस्थेच्या माध्यामातून सांगितले आहे.

Back to top button