Ponniyin Selvan 2: ऐश्वर्याच्या लूकवर अभिषेक बच्चन फिदा, ट्रेलर रिलीज

पोन्नियिन सेल्वन 2
पोन्नियिन सेल्वन 2
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आपला आगामी चित्रपट 'पोन्नियिन सेल्वन २'मुळे चर्चेत आहे. अभिनेत्री ऐश्वर्या लवकरच 'पोन्नियिन सेल्वन २' (Ponniyin Selvan 2) मध्ये दिसणार आहे. फॅन्स आधीपासूनच या चित्रपटाविषयी उत्सुक आहेत. ऐश्वर्या 'पोन्नियिन सेल्वन १' मध्ये दिसली होती. आता ऐश्वर्याने आगामी चित्रपटातील लूक शेअर केला आहे. फॅन्स तर तिच्यावर फिदा आहेत. आता तिचा पती आणि अभिनेता अभिषेक बच्चनदेखील ऐश्वर्याच्या लुकवर फिदा झाला आहे. (Ponniyin Selvan 2)

ऐश्वर्याने आपल्या इन्स्टाग्राम हँडलवर 'पोन्नियिन सेल्वन २' चे पोस्टर आणि टीझर शेअर केला आहे. या टीझरमध्ये प्रियांकाचा नंदिनी लूक फॅन्समध्ये खूप व्हायरल होत आहेत.

ऐश्वर्याने आपल्या सोशल मीडिया हँडलवर फॅन्ससोबत 'पोन्नियिन सेल्वन २'चा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ऐश्वर्याने चित्रपटाची रिलीज डेटदेखील सांगितली आहे. याशिवाय तिने एक पोस्ट शेअर केलीय. त्या कॅप्शनमध्ये लिहिलंय, 'उनकी आंखों में आग, उनके दिलों में प्यार, उनकी तलवारों पर खून, सिंहासन के लिए लड़ने के लिए चोल वापस आएंगे'

अभिषेकने ऐश्वर्याच्या पोस्टवर कमेंट करत एक फायर इमोजी शेअर केलाय. मणिरत्नम यांनी आपल्या पीएस च्या पहिल्या भागात चोल शासकांची कहाणी दाखवली होती. चित्रपटाता ट्रेलर बुधवारी २९ मार्च रोजी रिलीज झाला. 'पोन्नियिन सेल्वन' प्रसिद्ध लेखक कल्कि कृष्णमूर्ती यांच्या प्रसिद्ध कादंबरीवर आधारित आहे. चित्रपटामध्ये चियान विक्रम, ऐश्वर्या राय बच्चन, कार्थी, जयम रवि आणि त्रिशा कृष्णन यासारखे अनेक स्टार्स मुख्य भूमिकेत असतील.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news