पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केल्याबद्दल भाजपचे नेते केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी माफी मागीतली आहे. व सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओ बाबतीत स्पष्टीकरण दिले आहे. वाचा नेमकं काय आहे प्रकरण. (Political Fact Check )
गेले काही दिवस महाराष्ट्रात वादग्रस्त विधानांवरुन वातावरण चांगलचं तापलं आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एका कार्यक्रमात भाषण देताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले. त्यानंतर भाजपा प्रवक्ता सुधांशू त्रिवेदी यांनीही चुकीचं विधान केले होते. त्यानंतर मंत्री मंगलप्रभात लोढा यांनीही प्रतापगडावरील शिवप्रतापदिनाच्या सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या आग्र्याहून सुटकेशी केली. हा सर्व वाद सुरु असतानाचं कोकण महोत्सवाच्या कार्यक्रमात भाजपाचे आमदार प्रसाद लाड हे म्हणाले होते की, "स्वराज्यभूमी कोकण महोत्सव कशासाठी तुम्ही विचाराल. पण हिंदवी स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. संपूर्ण भारताचं आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म हा कोकणात झाला," या वेळी तेथील एका पदाधिकाऱ्याने त्यांना सांगितले छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरीवर झाला. त्यानंतर ते पुढे असेही म्हणाले की, 'महाराजाचं बालपण रायगडावर म्हणजे कोकणात गेलं,' या विधानांवरुन राज्यात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
प्रसाद लाड यांनी शिवरांच्याबद्दल केलेल्या चुकीचं विधान असतानाचं भाजपचे नेते केंद्रिय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनीही छत्रपती शिवाजी महाराज यांचा उल्लेख एकेरी करतानाचा व्हिडिओ सोशल मिडियावर वेगाने व्हायरल झाला. काही वृत्तवाहिन्यांनी रावसाहेब दानवे यांच आजचं विधान म्हणून वृत्त दिलं त्यानंतर रावसाहेब दानवे यांनी पुन्हा एकदा आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली.
काही चॅनेल्सने मी छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी शब्दाचा उल्लेख केला असं वृत्त दिलं आहे. याबाबत खुलासा करता दानवले म्हणाले, "दोन वर्षांपूर्वी नाशिक दौऱ्यावर असताना राज्यपालांच्या बोलण्यावर प्रतिक्रिया विचारली. त्या काळात माझ्याकडून अनावधापणाने एकेरी शब्दात उल्लेख केला. त्या काळात माझ्यावर टीकेची झोड उठली होती.त्याचवेळी मी समस्त देशवासियांची माफी सुद्धा मागितली होती. आज मी अशा प्रकारचं कोणतंही वक्तव्य केलेलं नाही. पुन्हा एकदा सर्व जनतेची माफी मागतो."
हेही वाचा