पिंपरी : पोलीस भरती परीक्षेत पोलिसांच्या सतर्कतेमुळे फसला ‘मुन्नाभाई’

पिंपरी : पोलीस भरती परीक्षेत पोलिसांच्या सतर्कतेमुळे फसला ‘मुन्नाभाई’
Published on
Updated on

पोलिस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी एकाने चक्क मास्कमध्ये इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस बसवले होते. मात्र, पोलिसांच्या सतर्कतेमुळे या ' मुन्नाभाईचा ' प्लॅन फसला आहे. हा प्रकार पिंपरी- चिंचवड येथील हिंजवडी येथे उघडकीस आला. पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी- चिंचवडच्या ७९० जागांसाठी आज उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जात आहे. शहरातील ८० केंद्रावर परीक्षेचे नियोजन करण्यात आले होते. (पोलीस भरती परिक्षा)

दरम्यान, दुपारी हिंजवंडी येथील केंद्रावर आलेल्या उमेदवारांची तपासणी सुरू होती. त्यावेळी आरोपी उमेदवाराच्या मास्कचे वजन जास्त असल्याचे एका पोलिसाच्या लक्षात आले. त्यामुळे त्याने मास्कची बारकाईने पाहणी केली असता आतमध्ये इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस बसवल्याचे समोर आले. यामध्ये एक सिमकार्ड देखील मिळून आले आहे. दरम्यान, आरोपी उमेदवाराने परीक्षा केंद्रावरून पळ काढला असून, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. (पोलीस भरती परिक्षा)

सन २००३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ' मुन्नाभाई एमबीबीएस ' या चित्रपटातील नायकाने डॉक्टर होण्यासाठी परीक्षेत अशाच प्रकारचे 'डिव्हाईस' वापरल्याचे दाखवण्यात आले. तेव्हापासून अशा प्रकारचे जुगाड करून परीक्षा पास होण्याचा असफल प्रयत्न केल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news