पुणे जिल्हा ग्रामीण पोलिस दलात मोठे फेरबदल; २८ पोलिस निरीक्षक, २९ सहाय्यक पोलिस निरीक्षकांच्या बदल्या  

पुणे जिल्हा ग्रामीण पोलिस दलात मोठे फेरबदल; २८ पोलिस निरीक्षक, २९ सहाय्यक पोलिस निरीक्षकांच्या बदल्या  
बारामती(पुणे); पुढारी वृत्तसेवा : जिल्हा ग्रामीण पोलिस अधिक्षक डाॅ. अंकित गोयल यांनी पोलिस दलात मोठे फेरबदल केले आहेत. दोन वर्षे पूर्ण झाल्याने आणि प्रशासकीय कारणास्तव पोलिस निरीक्षक, सहाय्यक पोलिस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. २८ पोलिस निरीक्षक तर २९ सहाय्यक पोलिस निरीक्षकांचा यामध्ये समावेश आहे.
गुरुवारी (दि. १३) रात्री बदल्यांचे आदेश काढण्यात आले. बदल्या झालेले पोलिस निरीक्षक पुढीलप्रमाणे (कोठून कुठे) : संजय शंकर जगताप (कामशेत ते शिरुर पोलिस ठाणे), अण्णासाहेब बाळासाहेब घोलप (सासवड ते राजगड पोलिस ठाणे), उमेश तावसकर (जेजुरी ते नियंत्रण कक्ष), महेश कृष्णराव ढवाण (पोलिस कल्याण शाखा ते रांजणगाव पोलिस ठाणे), बळवंत कुंडलिक मांडगे (रांजणगाव ते मंचर पोलिस ठाणे), सचिन दिनकर पाटील (राजगड ते नियंत्रण कक्ष), विलास शामराव भोसले (वडगाव मावळ ते सुरक्षा शाखा), सतीश भाऊसाहेब होडगर (मंचर ते आर्थिक गुन्हे शाखा), संतोष शामराव जाधव (सुरक्षा शाखा ते सासवड पोलिस ठाणे), बापूसाहेब पोपट सांडभोर (जिल्हा वाहतूक शाखा ते जेजुरी पोलिस ठाणे).
याशिवाय जिल्ह्यात नव्याने आलेल्या पोलिस निरीक्षकांना पदस्थापना देण्यात आली आहे. त्यात बबन शंकर पठारे (नियंत्रण कक्ष), आण्णा मन्याबा पवार (आर्थिक गुन्हे शाखा), ललित भगवान वर्टीकर (नियंत्रण कक्ष), रवींद्र दत्तात्रय पाटील (कामशेत पोलिस ठाणे), कुमार रामचंद्र कदम (वडगाव मावळ), दिनेश सखाराम तायडे (बारामती शहर पोलिस ठाणे), सुभाष सदाशिव चव्हाण (नियंत्रण कक्ष), राजेश गणेश गवळी (पोलिस कल्याण शाखा), सूर्यकांत देवराव कोकणे (नियंत्रण कक्ष), सुहास लक्ष्मण जगताप (जिल्हा वाहतूक शाखा), शंकर मनोहर पाटील (भोर पोलिस ठाणे) अशा नेमणूका करण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षकांच्या झालेल्या बदल्या पुढीलप्रमाणे (कोठून कुठे) : पृथ्वीराज योगिराज ताटे (नारायणगाव ते बारामती शहर), केशव यशवंत वाबळे (यवत ते शिक्रापूर), नितीन नेताजी अतकरे (शिक्रापूर- मुदतवाढ), राहूल पुंडलिक लाड (खेड ते लोणावळा शहर), निलीश पांडूरंग माने (लोणावळा ग्रामीण ते सायबर पोलिस ठाणे), प्रकाश व्यंकट वाघमारे (बारामती शहर- मुदतवाढ), मनोजकुमार नवसरे (राजगड ते जेजुरी), ज्ञानेश्वर महादेव धनवे (इंदापूर ते खेड), आकाश घनशाम पवार (कामशेत ते बारामती शहर), महेश अनिरुद्ध माने (इंदापूर ते यवत), संदेश बावकर (लोणावळा शहर ते यवत), दिपक दत्तात्रय करांडे (वाचक- खेड विभाग ते आर्थिक गुन्हे शाखा), महादेव चंद्रकांत शेलार (स्थानिक गुन्हे शाखा ते नारायणगाव पोलिस ठाणे प्रभारी), रणजित पठारे (शिक्रापूर ते वेल्हा पोलिस ठाणे प्रभारी),  किरण कारभारी भालेकर (मंचर ते घोडेगाव पोलिस ठाणे प्रभारी), बिरप्पा नागण्णा लातूरे (जिल्हा वाहतूक शाखा बारामती शहर ते नियंत्रण कक्ष), माधुरी तावरे (यवत ते हवेली), कुलदीप संकपाळ (बारामती शहर ते पौड),
याशिवाय जिल्ह्यात नव्याने दाखल झालेल्या किशोर विठ्ठल शेवते (लोणावळा ग्रामीण), सतीश मारुती पवार (शिक्रापूर), बालाजी तुळशीदास भांगे (जिल्हा वाहतूक शाखा बारामती शहर) यांनाही नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. नियंत्रण कक्षातील सपोनि अर्जून हरिबा मोहिते यांच्याकडे पुणे ग्रामीण एटीएसची जबाबदारी देण्यात आली आहे.
हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news