Delhi Farmers Protest : आंदोलक शेतकऱ्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

Delhi Farmers Protest
Delhi Farmers Protest

नवी दिल्‍ली ; पुढारी ऑनलाईन पंजाब-हरियाणा शंभू सीमेवर आंदोलक शेतकऱ्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा मारा केला. यावेळी हवेत मोठ्या प्रमाणावर धुर पसरल्‍याने आंदोलकांची पळापळ झाली. या मार्गावर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्‍त ठेवला आहे. आंदोलक शेतकऱ्यांची पिकांना एमएसपी हमी देणारा कायदा करण्याची मागणी आहे. सरकारबरोबर बोलणी फिस्‍कटल्‍यानंतर आंदोलक शेतकऱ्यांनी चलो दिल्‍लीचा नारा दिला आहे.

एमएसपीवर कायदा बनवण्यासह इतर मागण्यांसाठी पंजाब, हरियाणा आणि उत्‍तर प्रदेशातील आंदोलक शेतकऱ्यांनी आज मंगळवार (१३ फेब्रुवारी) रोजी 'चलो दिल्‍ली' मार्च ची घोषणा केली आहे. दिल्‍ली पोलिसांनी प्रवाशांना वाहतूकी विषयी सूचना केल्‍या आहेत. वाहतुकीला अनेक ठिकाणी निर्बंध लावल्‍याने दिल्‍ली-एनसीआर मध्ये लोकांना वाहतुकीच्या समस्‍येचा सामना करावा लागत आहे. अनेक मार्गांवर मंद गतीने वाहतूक सुरू आहे.

पिकांच्या किमान आधारभूत किमतीबाबत कायदा करावा यासह अनेक मागण्या घेऊन शेतकरी मंगळवारी पंजाब-हरियाणा येथून राष्ट्रीय राजधानी दिल्लीकडे मोर्चा काढत आहेत. त्‍या पार्श्वभूमीवर आंदोलक शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्‍त तैनात केला आहे. पोलिस प्रशासनाने दिल्‍लीकडे जाणाऱ्या सर्व सीमा सिल केल्‍या आहेत. अनेक रस्‍त्‍यांवरची वाहतूक वळविण्यात आली आहे. वाहतूकीच्या निर्बंधामुळे दिल्‍ली, नोएडा, गाजियाबाद, गुरूग्राम, फरीदाबादसह एनसीआरच्या शहरांमधील लोकांना ट्रॅफिक जामच्या समस्‍येचा सामना करावा लागत आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news