शरद पवारांनी निवडणूक आयोगाच्या आदेशाला दिले सुप्रीम कोर्टात आव्‍हान | पुढारी

शरद पवारांनी निवडणूक आयोगाच्या आदेशाला दिले सुप्रीम कोर्टात आव्‍हान

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाला ‘खरी राष्ट्रवादी’ म्हणून मान्यता देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज ( दि.१३ ) सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. निवडणूक आयाेगाचा निर्णय अयाेग्‍य असल्‍याचा दावा राष्‍ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने केली आहे.

६ फेब्रुवारी २०२४ रोजी निवडणूक आयोगाने अजित पवार यांच्‍या नेतृत्त्‍वाखालील गटाला खरी राष्‍ट्रवादी म्‍हणून मान्‍यता दिली होती. यानंतर दुसऱ्याच दिवशी, निवडणूक आयोगाने शरद पवार यांच्या गटाला ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार’ असे नवीन नाव दिले.
रविवारी माध्‍यमांशी बोलताना शरद पवार म्हणाले होते की, ज्यांनी पक्षाची स्‍थापना केली त्यांच्या हातून निवडणूक आयोगाने पक्ष हिसकावून घेतला आणि तो दुसर्‍याला दिला आहे. देशात यापूर्वी असे कधीच घडले नव्हते

Back to top button