Madhya Pradesh Accident : मध्य प्रदेशातील सिवनी येथे भीषण अपघात; ३ ठार, २६ पोलीस जखमी

Madhya Pradesh Accident : मध्य प्रदेशातील सिवनी येथे भीषण अपघात; ३ ठार, २६ पोलीस जखमी
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : मध्य प्रदेशातील सिवनी जिल्ह्यातील लोपा गावाजवळ पोलीस कर्मचाऱ्यांनी भरलेली बस आणि कारचा भीषण अपघात झाला. ३५ व्या बटालियनच्या एसएफ जवानांना घेऊन जाणारी बस कारला धडकल्यानंतर उलटली. या अपघातात कारमधील तिघांचा मृत्यू झाला. तर बसमधील २६ पोलीस जखमी झाले. शुक्रवारी (दि.६) रात्री हा अपघात झाला.

मांडला येथे राहणारे काही लोक नागपूरहून कारने घरी परतत होते. यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांना घेऊन सिवनीकडे येणारी बस धनगढजवळ कारला धडकली. या अपघातात कारमधील अशोक कुकरेजा, ममता जसवानी, निखिलेश जसवानी, कन्हैया जसवानी आणि पुरुषोत्तम उर्फ ​​काजू महोबिया हे गंभीर जखमी झाले. तर बसमध्ये प्रवास करणारे सुमारे २६ पोलीस कर्मचारी जखमी झाले.

माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमींना रुग्णवाहिकेच्या मदतीने रूग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी कारमधील जखमी निखिलेश जसवानी, कन्हैया जसवानी आणि पुरुषोत्तम उर्फ ​​काजू महोबिया यांना मृत घोषित केले. जखमी पोलिस कर्मचाऱ्यांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news