Ashadhi Ekadashi | जय हरी विठ्ठल! पीएम मोदी यांनी मराठीतून दिल्या आषाढी एकादशीच्या शुभेच्छा

Ashadhi Ekadashi | जय हरी विठ्ठल! पीएम मोदी यांनी मराठीतून दिल्या आषाढी एकादशीच्या शुभेच्छा
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : आज आषाढी एकादशी निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. "सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. हा शुभ दिवस आपल्याला वारकरी परंपरेला अनुसरुन भक्ती, नम्रता आणि करुणा हे भाव अंगीकारण्याची प्रेरणा देवो. भगवान विठ्ठलाच्या आशीर्वादाने, सुखी, शांतताप्रिय आणि सर्वसमावेशक समाजाच्या निर्मितीसाठी आपल्याला नेहमी एकत्र काम करता येऊ दे. जय हरी विठ्ठल!" असे पीएम मोदी यांनी ट्विट करत म्हटले आहे. (Ashadhi Ekadashi)

महाराष्ट्रासह इतर राज्यांतून सुमारे नऊ लाखांहून वैष्णव विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरात दाखल झाले आहेत. आज आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूर नगरी टाळ, मृदुंगाच्या गजरात व हरिनामाच्या जयघोषात दुमदुमून गेली आहे.

बळीराजाला चांगले दिवस येऊ देत, त्याच्यावरचे अरिष्ट दूर होऊ दे. पाऊस पडू दे, राज्य सुजलाम सुफलाम होऊ दे, शेतकरी, कष्टकरी, कामगार, वारकरी, धारकरी असा राज्यातील प्रत्येक घटक सुखी समाधानी होऊ देत. त्याच्या आयुष्यात चांगले दिवस येऊ देत, असे साकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आषाढी एकादशीच्या मुख्य शासकीय महापूजेवेळी विठूरायाच्या चरणी घातले.

आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांच्या पत्नी लता शिंदे तसेच मानाचे वारकरी दांपत्य भाऊसाहेब मोहिनीराज काळे व मंगल भाऊसाहेब काळे यांच्यासोबत विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा केली. (Ashadhi Ekadashi)

ईद निमित्तही शुभेच्छा

दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी ईद निमित्तही शुभेच्छा दिल्या आहेत. "Eid-ul-Adha च्या शुभेच्छा. हा दिवस सर्वांना सुख-समृद्धी घेऊन येवो. तसेच आपल्या समाजात एकोप्याची आणि सलोख्याची भावना टिकून राहो. ईद मुबारक!" असे पीएम मोदी यांनी म्हटले आहे.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news