Odisha triple train crash | पंतप्रधान मोदी आज ओडिशाला जाणार, रेल्वे अपघातस्थळी भेट देऊन घेणार परिस्थितीचा आढावा

Pulwama Attack
Pulwama Attack

भुवनेश्वर; पुढारी ऑनलाईन : ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यातील तिहेरी रेल्वे अपघातातील मृतांचा आकडा २८८ वर पोहोचला आहे. एकापाठोपाठ तीन रेल्वे गाड्यांची धडक होऊन हा अपघात झाला. तर सुमारे ९०० लोक जखमी झाले आहेत. घटनास्थळी बचावकार्य सुरु आहे. (Odisha triple train crash) दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ओडिशाला जाणार आहेत. पहिल्यांदा ते बालासोर येथील रेल्वे अपघातस्थळी भेट देऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतील आणि त्यानंतर ते कटक येथील रुग्णालयाला भेट देतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेल्वे अपघाताच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी तातडीची बैठक बोलावली आहे, असे वृत्त एएनआयने सरकारी सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे. जखमी प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी आणि उपचारासाठी भारतीय लष्करालाही तैनात करण्यात आले आहे. (Odisha train accident)

ब्रेकिंग न्यूज, लाईव्ह अपडेट आणि त्याज्या  घडमोडी तुमच्या WhatsApp वर मिळवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा Pudhari WhatsAPP

ओडिशातील रेल्वे अपघाताबद्दल पंतप्रधान मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे. या दु:खाच्या प्रसंगी शोकाकूल कुटुंबाप्रती माझ्या संवेदना आहेत. जखमी लवकर बरे होवोत. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी बोलून परिस्थितीचा आढावा घेतला. दुर्घटनेच्या ठिकाणी बचावकार्य सुरू असून संबंधितांना शक्य ती सर्व मदत केली जात असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करत म्हटले आहे.

या घटनेचे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यांनी घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनीही घटनास्थळी जाऊन पाहणी केली. ओडिशातील रेल्वे अपघातस्थळी असलेल्या रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटले आहे की, "आता आमचे लक्ष बचाव आणि मदत कार्यावर आहे." या रेल्वे अपघाताचे कारण तपासानंतर कळेल, असेही ते म्हणाले. (coromandel express train accident)

ओडिशातील तिहेरी रेल्वे अपघातानंतर तामिळनाडू आणि ओडिशा सरकारने शनिवारी एक दिवसाचा राज्य दुखवटा जाहीर केला आहे. तर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी बालासोरच्या रेल्वे दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे.

या घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना १० लाख, गंभीर जखमींना २ लाख आणि किरकोळ जखमी झालेल्यांना ५० हजार रुपयांची मदत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी जाहीर केली आहे.

 हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news