तेलंगणाच्या विकासाला गती देण्याचे सौभाग्य मिळाले : पंतप्रधान मोदी

तेलंगणाच्या विकासाला गती देण्याचे सौभाग्य मिळाले : पंतप्रधान मोदी
Published on: 
Updated on: 

 पुढारी ऑनलाईन डेस्क : आज मला पुन्हा तेलंगणाच्या विकासाला गती देण्याचे सौभाग्य मिळाले आहे. आज येथे सुरू झालेली वंदे भारत एक्सप्रेस ही श्रद्धा, आधुनिकता, तंत्रज्ञान आणि पर्यटन यांना जोडणारी आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. सिकंदराबाद आणि तिरुपती दरम्यान वंदे भारत एक्स्प्रेसला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवला. यानंतर ते बोलत होते.  यावेळी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासह इतर मान्यवर उपस्‍थित होते.

सिकंदराबाद-तिरुपती ही  देशातील 12 वी वंदे भारत एक्स्प्रेस आहे. यामुळे दोन्ही शहरांमधील प्रवासाचा वेळ सुमारे साडेतीन तासांनी कमी होणार आहे.  तिरुमला तिरुपती मंदिर येथे येणाऱ्या हजारो भाविकांसाठी ही  एक्स्प्रेस महत्त्‍वपूर्ण ठरणार आहे.  यावेळी ते म्हणाले की, "" (PM Narendra Modi )

'सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास'

यावेळी पंतप्रधान मोदी यांनी सिकंदराबाद-तिरुपती वंदे भारत एक्स्प्रेसची पाहणी केली. यावेळी उपस्थितांना संबोधताना पंतप्रधान म्हणाले की, "महान क्रांतिकारकांची भूमी असलेल्या  तेलंगणाला मी नमन करतो. आज मला पुन्हा तेलंगणाच्या विकासाला गती देण्याचे सौभाग्य मिळाले आहे. आज येथे सुरू झालेली वंदे भारत एक्सप्रेस ही श्रद्धा, आधुनिकता, तंत्रज्ञान आणि पर्यटन यांना जोडणारी आहे. गेल्या ९ वर्षांत हैदराबादमध्ये सुमारे ७० किलोमीटरचे मेट्रोचे जाळे तयार करण्यात आले आहे. हैदराबादच्या मल्टी मॉडेल ट्रान्सपोर्ट सिस्टीम (MMTS) प्रकल्पावरही काम झपाट्याने झाले आहे. तेलंगणाच्या विकासाबाबत केंद्रातील एनडीए सरकार तेलंगणातील जनतेच्या विकासाचे जे स्वप्न पाहिले होते ते पूर्ण करणे आपले कर्तव्य मानतो. 'सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास' हे मॉडेल घेऊन आम्ही पुढे जात आहोत."

तेलंगणाच्या विकासासाठी ६० हजार कोटी रुपयांच्या रस्ते प्रकल्पांवर काम सुरू आहे, ज्यात 'गेम चेंजर' हैदराबाद रिंग रोडचा समावेश आहे. रेल्वेसोबतच तेलंगणात महामार्गांचे जाळेही वेगाने विकसित केले जात आहे. केंद्र सरकारच्या सततच्या प्रयत्नांमुळे आज तेलंगणातील राष्ट्रीय महामार्गांची लांबी दुप्पट झाली आहे.२०१४ मध्ये येथे सुमारे २५०० किमी लांबीचा राष्ट्रीय महामार्ग होता, जो आज ५००० किमी इतका वाढला आहे, असेही पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.

PM Narendra Modi : राज्य सरकारकडून सहकार्य मिळत नाही

केंद्र सरकारच्या बहुतांश प्रकल्पांमध्ये राज्य सरकारकडून सहकार्य मिळत नसल्यामुळे प्रत्येक प्रकल्पाला विलंब होत आहे. त्याचा त्रास तुम्हा लोकांना होत आहे. मी राज्य सरकारला विनंती करतो की, विकासाशी संबंधित कोणत्याही कामात कोणताही अडथळा येऊ देऊ नये. तेलंगणाला एम्स देण्याचा बहुमानही आमच्या सरकारला मिळाला आहे. मात्र, केंद्र सरकारच्या या प्रयत्नांमध्ये मला एका गोष्टीचे खूप वाईट वाटते ते यासाठी की, काही लोकांना देशहिताशी आणि समाजाच्या हिताशी काहीही देणेघेणे नसते, अशा लोकांना फक्त त्यांचे कुटुंब भरभराट झालेले पाहणे आवडते. तेलंगणाला अशा लोकांपासून अत्यंत सावधगिरी बाळगावी लागेल, असेही पंतप्रधान म्‍हणाले.

आमची प्राथमिकता देशवासीयांच्या आशा पूर्ण करणे

आजच्या नव्या भारतात देशवासीयांच्या आशा पूर्ण करणे ही आमची प्राथमिकता आहे; परंतु मूठभर लोक विकासाच्या या कामांवर नाराज आहेत. कुटुंबवाद, घराणेशाही आणि भ्रष्टाचार जोपासणाऱ्या अशा लोकांना प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांमुळे अडचणी येतात. त्याचबरोबर त्यांनी यावेळी भ्रष्टाचाराच्या मुळावरच हल्ला चढवला. ते म्हणाले की, "आम्ही देशभरात डिजिटल पेमेंटची व्यवस्था वाढवली आहे; पण हे आधी का झाले नाही? ते घडले नाही कारण घराणेशाही शक्तींना व्यवस्थेवरील नियंत्रण सोडायचे नव्हते. कोणत्या लाभार्थ्याला कोणता लाभ आणि किती मिळणार यावर नियंत्रण काही कुटुंबियांना ठेवायचे होते. आम्ही देशभरात डिजिटल पेमेंटची व्यवस्था वाढवली आहे, हे आधी का शक्य नव्हते? कुटुंब-आधारित शक्तींना व्यवस्थेवरील नियंत्रण सोडायचे नव्हते म्हणून ते होऊ शकले नाही."

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news