नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी पुन्हा एकदा महागाईच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमती, खासगीकरण आणि तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणे या मुद्द्यांवर त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. पंतप्रधान मोदींच्या दैनंदिन कामांची यादी त्यांनी ट्विटमध्ये जाहीर केली आहे. यासोबतच राहुल गांधींनी "रोझ मॉर्निंग की बात" असे लिहिले आहे.
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 22 मार्च ते 30 मार्चपर्यंत सातत्याने वाढ होत आहे. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती घसरल्या असतानाही भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती मात्र वाढत आहेत.
दरम्यान, यापूर्वी 24 मार्च रोजी राहुल गांधी यांनी ट्विट करून केंद्र सरकारवर हल्लाबोल केला होता. त्यांनी लिहिले की, केंद्र सरकारने कोरोनाबाधितांवर मोफत उपचार केले होते का? गरीब आणि कामगारांना किमान उत्पन्न देण्याचे आश्वासन केंद्र सरकारने पूर्ण केले का? सरकारने लघुउद्योगांना बुडण्यापासून वाचवले का? असे आरोप राहूल गांधींनी केले.
हेही वाचा