PM Modi : काँग्रेसला सत्तेपासून 100 वर्षे दूर ठेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी

PM Modi : काँग्रेसला सत्तेपासून 100 वर्षे दूर ठेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी

भोपाळ, वृत्तसंस्था : मध्य प्रदेशात काँग्रेस सत्तेत आल्यावर राज्याचा विनाश होईल, असे स्पष्ट करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सतना येथील सभेत भाजपला मतदान करण्याचे आवाहन केले. काँग्रेस सत्तेत आल्यास विकास ठप्प होईल. त्यामुळे या पक्षाला आणखी 100 वर्षे सत्तेपासून दूर ठेवण्याची गरज आहे, असे ते म्हणाले. (PM Modi)

देशाच्या प्रगतीमध्ये काँग्रेस अडथळा ठरण्याची शक्यता आहे. या पक्षाची सत्ता आल्यास रिव्हर्स गिअरमध्ये विकास जाण्याची दाट शक्यता आहे. आपले एक मत मध्य प्रदेशात भाजपला सत्तेत येण्यास, केंद्रात मोदी सरकार मजबूत करण्यास आणि काँग्रेसला 100 वर्षे सत्तेपासून दूर ठेवण्यास मदत करणार असल्याचे ते म्हणाले.

काँग्रेस सत्तेत आल्यास मोफत धान्य आणि आरोग्यसेवा बंद केल्या जातील. काँग्रेस म्हणजेच विकासाचा नाश, असे समीकरण आहे. त्यामुळे मतदारांनी काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. जनतेला भाजपच्या हमीवर विश्वास असल्याचे त्यांनी सांगितले. (PM Modi)

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news