पुढारी वृत्तसेवा, नवी दिल्ली दि 12, फ्रान्सचा दौरा आटोपल्यानंतर परतताना 15 जुलै पंतप्रधान नरेंद्र मोदी संयुक्त अरब अमिरातला जाणार आहे, अशी माहिती बुधवारी सरकारी सूत्रांनी दिली. 13 आणि 14 तारखेला मोदी फ्रान्सच्या दौऱ्यावर असतील. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्यूएल मॅक्राॅन यांच्या निमंत्रणावरुन मोदी त्या देशाच्या नॅशनल डे परेडमध्ये सामील होणार आहेत. PM Modi
फ्रान्स दौऱ्यावेळी 26 राफेल-मरिन फायटर विमाने, तसेच स्कॉर्पिन कलावरी पाणबुड्या खरेदी करण्याबाबतच्या करारावर स्वाक्षऱ्या होण्याची शक्यता आहे. फ्रान्स दौऱ्यावरुन परतत असताना 15 तारखेला मोदी संयुक्त अरब अमिरातला जातील. या देशाचे अध्यक्ष मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांच्यासह इतर प्रमुख नेत्याची मोदी भेट घेणार आहेत. गतवर्षी जर्मनीत झालेल्या जी 7 परिषदेहून परत येताना मोदी हे संयुक्त अरब अमिरातीला गेले होते. त्यावेळीही मोदी यांनी नाह्यान यांची भेट घेतली होती.