पुढारी ऑनलाईन डेस्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोन दिवसीय गुजरात दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. आज सकाळी त्यांनी देशाचे पहिले गृहमंत्री, लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त केवडियातील स्टॅच्यू ऑफ युनिटी येथे पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.
पंतप्रधान मोदींनी सरदार वल्लभभाई पटेल यांना त्यांच्या १४८ व्या जयंतीनिमित्त एक्स'वर पोस्ट करून देखील आदरांजली वाहिली आहे. त्यांनी लिहिले की, "सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त, आम्ही त्यांचे अदम्य भावना, दूरदर्शी नेतृत्व आणि असाधारण समर्पणाचे स्मरण करतो ज्याद्वारे त्यांनी आपल्या देशाचे भाग्य घडवले. त्यांची राष्ट्रीय एकात्मतेची बांधिलकी आजही आपल्याला मार्गदर्शन करते. आम्ही त्यांचे सदैव ऋणी राहू."
दरम्यान, पंतप्रधान मोदी आज (दि.३१) सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त 'मेरा युवा भारत' ही युवकांची देशव्यापी संघटना सुरू करणार आहेत. रविवारी मन की बातमध्ये त्यांनी ही घोषणा केली होती.
हेही वाचा :