PM Modi Nashik Visit : खबरदारी म्हणून आरोग्य यंत्रणाही अलर्ट मोडवर

PM Modi Nashik Visit : खबरदारी म्हणून आरोग्य यंत्रणाही अलर्ट मोडवर
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सर्वच शासकीय यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. त्यानुसार आरोग्य विभागानेही प्रोटोकॉलनुसार खबरदारी म्हणून तीन ठिकाणी आपत्कालीन रुग्णालयांसह रुग्णवाहिका व रक्तदाते यांची व्यवस्था केली आहे.

शहरात पंतप्रधान मोदी यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह इतर मंत्री शुक्रवारी (दि.१२) येत आहेत. त्यामुळे त्यांना पुरवलेल्या सुरक्षाव्यवस्थेप्रमाणे खबरदारी म्हणून आरोग्य विभागही सतर्क झाला आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयात स्वतंत्र कक्ष राखीव ठेवला आहे. एचएएल येथे व पंचवटीतील अपोलो रुग्णालयातही कक्ष तयार करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे आठ अत्याधुनिक रुग्णवाहिका ताफ्यात तैनात असून, त्यात तज्ज्ञ डॉक्टर, परिचारिका व सहायकांची नियुक्ती केली आहे. त्याचप्रमाणे 'ए प्लस' व 'ए निगेटिव्ह' रक्तगटाचे दातेही तयार करण्यात आले आहेत.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news