Uttarkashi tunnel rescue
Uttarkashi tunnel rescue

PM Modi : ‘जैवविविधता संवर्धन आणि संरक्षण क्षेत्रात भारत सातत्यपूर्ण आघाडीवर’

Published on

पुढारी ऑनलाइन डेस्क : PM Modi : भारताने नुकतेच इंटरनॅशनल बिग कॅट अलायंसची सुरुवात केली आहे. आपल्या पृथ्वीला वाचवण्यासाठी या प्राण्यांचे संरक्षण खूप गरजेचे आहे. प्रोजेक्ट टाइगरमधून आम्ही खूप काही शिकलो आहोत. त्याच अनुभवाच्या आधारे आम्ही ही महत्वपूर्ण सुरुवात केली आहे. प्रोजेक्ट टायगरमुळे आज जगातील 70 टक्के वाघ भारतात आढळतात. सोबतच आम्ही प्रोजेक्ट लॉयन आणि प्रोजेक्ट डॉल्फिन वरही काम करत आहोत. जैवविविधता संवर्धन, संरक्षण आणि संवर्धनासाठी काम करण्यात भारत सातत्यपूर्ण आघाडीवर आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

चेन्नई येथे पर्यावरण आणि जलवायू स्थिरता विषयावर मंत्री स्तरीय बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संबोधित केले. यावेळी त्यांनी प्राणी संवर्धनाविषयी महत्वपूर्ण माहिती दिली. याशिवाय सौर उर्जा तसेच नवीकरणीय ऊर्जा क्षमतेबाबत ही संबोधन केले.

PM Modi : काय आहे बिग कॅट अलायंस प्रोग्राम

बिग कॅट अलायंसबद्दल अधिक माहिती देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, 9 एप्रिल 2023 ला कर्नाटकच्या म्हैसूरमध्ये प्रोजेक्ट टायगरला 50 वर्ष पूर्ण झाले. याचे औचित्य साधत भारत सरकारने इंटरनॅशनल बिग कॅट अलायंस (IBCA) या कार्यक्रमाची सुरुवात केली. या कार्यक्रमाच्या माध्यमातून सरकारने वाघ, बिबट्या, बर्फाळ प्रदेशातील बिबट्या, चित्ता, जगुआर आणि प्यूमा यांच्या सरंक्षणाची योजना तयार केली. पंतप्रधान म्हणाले, आपल्या पृथ्वीला वाचवण्यासाठी आणि नैसर्गिक संतूलनासाठी या प्राण्यांचे संरक्षण खूप गरजेचे आहे. देशात चित्ता पुनर्स्थापन प्रकल्प याच कार्यक्रमाचा भाग होता. या प्रकल्पाअंतर्गत भारत सरकारने आफ्रिकेतून चित्ते आणून भारतात त्यांची पुनर्स्थापना करण्याचा प्रयत्न केला.

सौर उर्जा क्षेत्रात भारत खूप पुढे

प्रधानमंत्री मोदी यांनी यावेळी स्वच्छ आणि नवीकरणीय ऊर्जेबाबत देखील या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमधून संबोधित केले. ते म्हणाले की, आज भारत स्थापित नवीकरणीय ऊर्जा क्षमतेच्या बाबतीत जगातील शीर्ष पाच देशांपैकी एक आहे. आम्ही आम्ही आमच्या आंतरराष्ट्रीय भागीदारांसोबत सौर अलायन्स, CDRI आणि लीडरशिप ग्रुप फॉर इंडस्ट्री ट्रान्सफॉर्मेशनसह सहयोग करत राहू. जैवविविधता संवर्धन, संरक्षण आणि संवर्धनासाठी काम करण्यात भारत सातत्यपूर्ण आघाडीवर आहे.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news