Mann Ki Baat : G20 चे अध्यक्षपद देशाला यावर्षी मिळालेली मोठी संधी : पीएम मोदी

Mann Ki Baat : G20 चे अध्यक्षपद देशाला यावर्षी मिळालेली मोठी संधी : पीएम मोदी

Published on

पुढारी ऑनलाईन: Mann Ki Baat : भारतासाठी २०२२ हे वर्ष अनेक दृष्टीने प्रेरणादायी आणि आश्चर्यकारक ठरले आहे. या वर्षी भारताने आपल्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण केली आणि अमृतकालही सुरू झाला आहे. G20 चे भारताला मिळालेले अध्यक्षपद हे देशाला २०२२ मध्ये मिळालेली मोठी संधी असल्याचेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

Mann Ki Baat : देशाला यावर्षी नवी गती मिळाली आणि सर्व देशवासीयांना एकापेक्षा एक सरस गोष्टी करता आल्या. तसेच २०२२ मध्ये भारत ही जगातील ५ वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला असल्याचेही पीएम मोदी यांनी सांगितले. 'मन की बात' या कार्यक्रमात ते बोलत होते. मन की बातची ही 96 वी आवृत्ती आहे असून, २०२२ चा हा शेवटचा भाग आहे. 'मन की बात' मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व भारतवासियांना नाताळाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.

Mann Ki Baat : पुढे बोलताना पीएम मोदी म्हणाले, २०२२ हे वर्ष आणखी एका कारणासाठी नेहमी लक्षात राहील. या वर्षात मोठ्या प्रमाणात 'एक भारत श्रेष्ठ भारत' च्या भावनेचा विस्तार झाला आहे. देशातील लोकांनी अनेक कार्यक्रमातून एकता आणि एकात्मता साजरे करणारे क्षण अनुभवले. यावेळी त्यांनी हर घर तिरंगा या कार्यक्रमाचा उल्लेख करताना, स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृतमहोत्सवानिमित्त संपूर्ण देश तिरंगामय झाल्याचाही मोदी यांनी यावेळी उल्लेख केला. २०२२ या वर्षात जगभरात भारताने आपले एक वेगळे स्थान निर्माण केले असल्याचेही ते म्हणाले.

Mann Ki Baat : टाटा रिसर्च सेंटरने ब्रेस्ट कॅन्सरवर केलेला रिसर्च आणि त्यांनी यावर मार्केटमध्ये आणलेली लस रूग्णांना अधिक गुणकारी ठरेल, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. दिल्लीच्या एम्स रूग्णालयातही पारंपारिक चिकित्सा पद्धतींवर आधारित अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि संशोधन पद्धती वापरल्या जात असल्याचे ते म्हणाले.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news