कठोर लढाईसाठी सज्ज रहा : पंतप्रधान मोदी यांचा भाजप नेत्यांना संदेश

कठोर लढाईसाठी सज्ज रहा : पंतप्रधान मोदी यांचा भाजप नेत्यांना संदेश

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा- भविष्यात पक्षाचा जसा विस्तार होईल आणि त्याला यश मिळत जाईल, तसतसे विरोधी पक्षांचे हल्ले वाढत जातील, त्यामुळे कठोर लढाईसाठी सज्ज रहा, असा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (दि.२८) भाजप नेत्यांना दिला. पक्षाच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत ते बोलत होते.

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामकाजादरम्यान झालेली भाजप संसदीय मंडळाची ही पहिलीच बैठक होती. ईशान्य भारतातील तीन राज्यांमध्ये पक्षाला मिळालेल्या यशाबद्दल बैठकीच्या प्रारंभी पंतप्रधान मोदी यांचे अभिनंदन करण्यात आले.

त्रिपुरा, मेघालय आणि नागालॅंडमधील नेत्यांनी यावेळी मोदी यांचा सत्कार केला. येत्या 6 ते 14 एप्रिलदरम्यान सामाजिक न्याय आठवडा साजरा केला जाणार आहे. या काळात खासदारांनी सामाजिक न्यायाच्या मुद्द्यावर लक्ष केंद्रित करावे तसेच 15 मे ते 15 जून या एका महिन्याच्या कालावधीत जनतेपर्यंत पोहोचून गेल्या 9 वर्षांत रालोआ सरकारने काय-काय साध्य केले, याची माहिती द्यावी, असे निर्देश मोदी यांनी दिले.

अदानी प्रकरण तसेच काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्याच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांनी संसद आणि संसदेबाहेर आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे मोदी यांनी भाजप नेत्यांना दिलेला संदेश महत्त्वपूर्ण मानला जात आहे. राहुल गांधी यांचा खासदारकी रद्द होणे हा लोकशाहीवरचा हल्ला असल्याचे विरोधी पक्ष सांगत आहेत तर भाजपने प्रामुख्याने राहुल गांधी यांना लक्ष्य करत गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर तसेच ओबीसी समाजाचा अपमान केला असल्याचा आरोप चालवला आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news