पिंपळनेर (जि.धुळे) : पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील म्हसदी बाजारपेठेत तरूणाने 57 वर्षीय इसमाच्या डोक्यात काठीने अमानुष मारहाण केली. यामध्ये सदर इसम गंभीर जखमी झाल्याने वैद्यकीय उपचाराकरीता दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान वृद्धाचे निधन झाले आहे.
साक्री पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक संदिप मुरकुटे यांनी सरकारपक्षातर्फे दिलेल्या फिर्यादीनुसार गुरुवार (दि.४) रोती सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास म्हसदी बाजारपेठेत पंकज अंकुश मोरे (रा.म्हसदी) याने भास्कर मोतीराम मोरे (57, रा. देऊर म्हसदी) यांच्या डोक्यात काठीने अमानुष मारहाण केली. या मारहाणीत भास्कर मोरे यांना गंभीर स्वरूपाची दुखापत झाली. त्यांना तत्काळ उपचारासाठी दाखल केले असता उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर धुळे येथील हिरे मेडिकल महाविद्यालय येथे वैद्यकीय अहवालात मयतास जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाल्याने पंकज मोरे याच्यावर दखलपात्र गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले आहे. या फिर्यादीवरून साक्री पोलीस ठाण्यात पंकज मोरे विरूध्द गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तर पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक किरण पाटील करीत आहेत.
हेही वाचा: