Philippines : कपड्यांच्या कारखान्याला लागलेल्या आगीत १६ जणांचा मृत्यू, ३ जखमी

Philippines : कपड्यांच्या कारखान्याला लागलेल्या आगीत १६ जणांचा मृत्यू, ३ जखमी

पुढारी ऑनलाईन डेस्क : फिलीपाईन्समधील एका कपड्यांच्या कारखान्याला आग लागली. या आगीत  १६ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. हा कपड्यांचा कारखाना टी-शर्ट प्रिंटिंग व्यवसायासाठी गोदाम आणि कामगारांचे निवासस्थान म्हणून वापरला जात होता. दोन मजली असलेल्या इमारतीला (दि.३१) सांयकाळी आग लागली. (Philippines)

माहितीनुसार, निवासस्थान आणि गोदाम म्हणून वापरल्या जाणार्‍या मालमत्तेला लागलेल्या आगीत गुरुवारी (दि.३१) फिलीपाईन्सच्या राजधानीत 16 लोकांचा आगीत होरपळून मृत्यू झाला आणि तीन जण जखमी झाले, असे अग्निशमन अधिकाऱ्यांनी सांगितले. पहाटेच्या सुमारास लागलेली आग कशामुळे लागली हे अद्याप समजू शकले नाही. अग्निसुरक्षा ब्युरोचे प्रवक्ते डग्लस गुय्याब यांनी सांगितले की, दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून तीन जण बचावले.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news