जम्मू-काश्मीरमध्ये कुठल्याही क्षणी निवडणुका घेण्याची तयारी! सर्वोच्च न्यायालयात केंद्र सरकारचे उत्तर | पुढारी

जम्मू-काश्मीरमध्ये कुठल्याही क्षणी निवडणुका घेण्याची तयारी! सर्वोच्च न्यायालयात केंद्र सरकारचे उत्तर

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : केंद्रशासित प्रदेश जम्मू-काश्मीर मध्ये कुठल्याही क्षणी निवडणुका घेण्याची तयारी आहे, असे उत्तर केंद्र सरकारने गुरूवारी सर्वोच्च न्यायालयात दिले.यासंदर्भातील निर्णय केंद्रीय तसेच राज्य निवडणूक आयोगावर अवलंबून असल्याचे देखील केंद्राने स्पष्ट केले.अनुच्छेद ३७० हटवण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुरू असलेल्या सुनावणी दरम्यान केंद्राने ही माहिती दिली.
सध्या मतदार यादी अद्ययावत करण्याची प्रक्रिया सुरू असून येत्या महिन्याभरात ती पूर्ण केली जाईल. केंद्रशासित प्रदेश जम्मू-काश्मीर ला पूर्ण राज्याचा दर्जा बहाल करण्यास आणखी थोडा वेळ लागेल,अशी माहिती केंद्राच्या वतीने सॉालिसटर जनरल तुषार मेहता यांनी दिली.२०१८ च्या तुलनेत २०२३ मध्ये जम्मू-काश्मीर मधील दहशतवादी घटनांमध्ये ४५.२ टक्क्यांची घट झाली असून घुसखोरी ९० टक्क्यांपर्यंत कमी झाली आहे.
दगडफेक आणि कायदा-सुव्यवस्थेच्या घटना ९७ टक्क्यांनी घटल्या आहेत.अशा घटनांमध्ये मृत्युमूखी पडणाऱ्या सुरक्षा कर्मचाऱ्यांची संख्या ६५ टक्क्यांनी घटली आहे.२०१८ मध्ये दगडफेकीच्या १ हजार ७६७ घटना घडल्या.२०२३ मध्ये हे प्रमाण शून्यावर पोहचले आहे.२०१८ मध्ये ५२ वेळा संघटीत बंद पुकारण्यात आले होते. आता हे प्रमाण शून्याच्या घरात आहे, अशी माहिती केंद्राच्या वतीने मेहता यांनी न्यायालयात दिली.

Back to top button