पाकिस्‍तानमधील लोक नाखूष; आता म्‍हणतात, फाळणी चूक होती : सरसंघचालक

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत.

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : स्वातंत्र्याच्या सात दशकांनंतरही पाकिस्‍तानमधील जनता ही अनेक समस्‍यांना तोंड देत आहे. या देशातील लोक नाखूष आहेत. भारताची फाळणी ही चूक होती, असे मत आता पाकिस्तानचे लोक व्‍यक्‍त करत आहेत, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी सांगितले. किशोर क्रांतिकारक हेमू कलानी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला देशाच्या विविध भागातील सिंधी बांधव उपस्‍थित होते.

नवा भारत घडवणे गरजेचे

१९४७ पूर्वी भारत अखंड हेाता. मात्र काहींच्‍या हट्‍टामुळे जे भारतापासून तुटले ते आजही सुखी आहेत का?, असा सवाल करत भागवत यांनी पाकिस्‍तानमधील सद्‍यस्‍थितीवर भाष्‍य केले. तसेच ' अखंड भारत (सध्या आधुनिक अफगाणिस्तान, बांगलादेश, भूतान, भारत, मालदीव, म्यानमार, नेपाळ, पाकिस्तान, श्रीलंका आणि तिबेटमध्ये असलेले सर्व प्राचीन भाग असलेल्या देशाची संकल्पना) हेच वास्‍तव आहे. विभाजित भारत हे 'दुःस्वप्न' आहे. नवा भारत घडवण्याची गरजेचे आहे, असे आवाहनही त्‍यांनी केले.

यापुढेही सर्जिकल स्‍ट्राइक करत राहू : सरसंघचालक

भारताने पाकिस्‍तानवर हल्‍ला करावा, असे मला म्‍हणायचे नाहीदुसर्‍यांवर हल्‍ले करावे, अशी भारताची संस्‍कृती नाही. मात्र आम्ही स्वसंरक्षणासाठी चोख प्रत्युत्तर देणार्‍या संस्कृतीचे आहोत, असे स्‍पष्‍ट करत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी पाकिस्‍तानमधील दहशतवादी तळांवर झालेल्‍या सर्जिकल स्‍ट्राइकचा संदर्भ देत आम्‍ही सर्जिकल स्‍ट्राइक केले आणि यापुढेही करत राहू, असा इशाराही त्‍यांनी यावेळी दिला.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news