PBKSvsSRH : सनराईजर्स हैदराबादचा दणदणीत विजय

PBKSvsSRH : सनराईजर्स हैदराबादचा दणदणीत विजय
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएलमध्ये आज मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडियमवर खेळवल्या गेलेल्या सामन्यात सनराईजर्स हैदराबादने दिमाखदार विजय मिळवला. ॲडम मार्क्रम २७ चेंडूमध्ये ४१ आणि निकोलस पूरनच्या ३० चेंडूमध्ये ३५ धावांच्या खेळीच्या जोरावर सनराईजर्स हैदराबादने पंजाब किंग्जवर ७ विकेट्सने दमदार विजय मिळवला.

पंजाब किंग्जने प्रथम गोलंदाजी करताना सनराईजर्स हैदराबादसमोर १५२ धावांचे आव्हान ठेवले होते. पंजाब किंग्जकडून लियम लिविंगस्टोनने ३३ चेंडूमध्ये ६० धावांची आक्रमक खेळी केली. दरम्यान, सनराईजर्स हैदराबादच्या गोलंदाजांच्या अचूक माऱ्यासमोर पंजाब किंग्जचा संघ सर्वबाद १५१ धावांपर्यंत पोहचू शकला.

सनराईजर्स हैदराबादकडून उम्रान मलिकने २६ रन्स देत ४ विकेट्स पटकावल्या. तर भुवनेश्वर कुमारने ४ षटकांमध्ये फक्त २२ रन्स देत ३ विकेट्स पटकावल्या. पंजाब किंग्जकडून लियम लिविंगस्टोन शिवाय इतर कोणीही चांगील कामगिरी करू शकले नाही.

हेही वाचलंत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news