Patthe Bapurao Movie : अमृता खानविलकर-प्रसाद ओक यांचा ‘लोकशाहीर पठ्ठे बापूराव’

अमृता खानविलकर-प्रसाद ओक
अमृता खानविलकर-प्रसाद ओक

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेता, दिग्दर्शक प्रसाद ओक यांनी "कच्चा लिंबू", "हिरकणी", "चंद्रमुखी" अशा चित्रपटांतून आपलं दिग्दर्शकीय कौशल्य दाखवून दिलं आहे. आता ते शाहिरी परंपरेतलं अजरामर नाव असलेल्या लोकशाहीर पठ्ठे बापूराव यांचं जीवनचरित्र 'पठ्ठे बापूराव' या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर घेऊन येत आहेत. या चित्रपटात त्यांच्यासह अमृता खानविलकर "पवळा" च्या भूमिकेत दिसणार आहे. घटस्थापनेच्या मुहूर्तावर या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण सोशल मीडियावर करण्यात आले.

संबंधित बातम्या –

स्वरुप स्टुडिओज या निर्मिती संस्थेच्या माध्यमातून प्रभाकर परब, सचिन नारकर, विकास पवार आणि डेस्टिनी प्रॉडक्शन्सच्या प्रकाश देवळे, सपना लालचंदानी हे "पठ्ठे बापूराव" या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. चित्रपटाचे लेखन आबा गायकवाड यांनी केले असून छायांकन संजय मेमाणे यांचे असणार आहे.

श्रीधर श्रीकृष्ण कुलकर्णी रेठरेकर, महाराष्ट्राच्या शाहिरी परंपरेत "पठ्ठे बापूराव" या नावानं प्रसिद्ध झाले. पठ्ठे बापूरावांनी गण, गौळण, भेदिक, झगड्याच्या, रंगबाजीच्या, वगाच्या अशा विपुल लावण्या रचल्या. त्यांच्या लावण्या आणि कवनं तमाशा फडातून गायल्या जात होत्या. मात्र त्यांना त्यांच्या जीवनात मोठा संघर्ष करावा लागला. पठ्ठे बापूरावांचा हाच जीवनसंघर्ष नव्या पिढीपर्यंत आणण्याचा प्रयत्न प्रसाद ओक, स्वरूप स्टुडिओज आणि डेस्टिनी प्रॉडक्शन्स करत आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news