शेवगाव-पाथर्डीसाठी आता अमरापूर-माळी बाभुळगाव पाणी योजना; 128 कोटींच्या निधीला प्रशासकीय मंजुरी

शेवगाव-पाथर्डीसाठी आता अमरापूर-माळी बाभुळगाव पाणी योजना; 128 कोटींच्या निधीला प्रशासकीय मंजुरी
Published on
Updated on

रमेश चौधरी

शेवगाव : कालबाह्य झालेली शेवगाव-पाथर्डी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना आता अमरापूर-माळीबाभुळगाव व 52 गावे योजना म्हणून नव्याने आस्तित्वात आली आहे. त्यास जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत सुधारात्मक पुनर्जोडणीस शासनाने 128 कोटींच्या निधीला प्रशासकीय मंजुरी दिली आहे. माजी आमदार चंद्रशेखर घुले यांच्या प्रयत्नाने या योजनेस 2013 मध्ये तत्त्वतः मंजुरी मिळाली होती.

सन 1993 मध्ये प्रशासकीय मंजुरीनंतर 1994 पासून प्रत्यक्ष कामास सुरुवात झालेल्या 19 कोटी 71 लाख 54 हजार रुपये खर्चाची शेवगाव पाथर्डीसह 44 गावांची प्रादेशिक पाणीपुरवठा योजना 9 एप्रिल 1999 मध्ये कार्यान्वित झाली

गुंजाळे घाटात सापडला मानवी हाडांचा सांगाडा, घातपात की जादूटोणा याबाबत चर्चा
.
त्यानंतर या योजनेत काही गावांचा समावेश करण्यात आला. सदर योजनेचे आयुर्मान 2006 म्हणजे 16 वर्षांपूर्वीच कालबाह्य झाले. याबाबत माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी आपल्या सत्ताकालावधीत सन 2013 मध्ये नवीन पाणी पुरवठा योजनेसाठी 120 कोटींचा प्रस्ताव तयार केला होता.

त्यास तात्कालीन राज्याचे पाणीपुरवठा मंत्री दिलीप सोलप, सचिव राजेशकुमार व जीवन प्राधिकरणचे सदस्य सचिव सोनिया शेट्टी यांनी नागपूर येथील बैठकीत तत्त्वत: मंजुरी दिली होती. घुले यांनी ही योजना डबघाईला आल्याचे तत्कालीन पाणीपुरवठा मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, सचिव मालिनी शंकर, जिल्हा प्रशासन सदस्य सचिव मोपलवार यांच्या निदर्शनास आणून त्याचा पाठपुरावा केला होता. त्यासाठी घुले यांनी मार्च 2013 मध्ये झालेल्या अधिवेशनात शासनाचे याकडे लक्ष वेधले होते.

38 नवीन टाक्या बांधणार

अस्तित्वातील मुख्य संतुलन टाक्या वापरून नवीन लोकसंख्या पाणी मागणी लक्षात घेता एकूण 38 नवीन टाक्या बांधण्यात येणार आहेत. लाभार्थी गावांत 276 किलोमीटर लांबी प्रस्तावित करण्यात आली आहे. अस्तित्वात असलेले जलशुद्धीकरण केंद्र दुरुस्त करण्यात येणार असून, जुन्या ए.सी.पाईप्स ऐवजी नव्याने एच.डी.पी.ई. व डी.आय. पाईप वाहिनी प्रस्तावित आहे. वाड्या-वस्त्या गृहीत धरून सर्व घराला पाणी देणारी ही योजना दोन-तीन वर्षांत पूर्ण होण्याची शक्यता आहे.

स्वतंत्र पाणी पुरवठा योजनेस मंजुरी

शेवगाव व पाथर्डी शहरास नगरपरिषद अंतर्गत स्वंतत्र पाणी पुरवठा योजनेस मंजुरी मिळाल्याने आता तब्बल 9 वर्षांनंतर दोन्ही तालुक्याच्या ग्रामीण भागातील लाभार्थ्यांसाठी अमरापूर, माळी बाभुळगाव आणि 52 गावे नामांतराने अस्तिवात आली असून, त्यास 128 कोटी 18 लाख अंदाजपत्रकीय किमतीस 2 मे रोजी प्रशासकीय मंजुरी प्राप्त झाली आहे. यासाठी सन 2052पर्यंत 1 लाख 61 हजार 866 लोकसंख्या संकलित करण्यात आली.

मुख्य जॅकवेल व जोडपूल एकत्र

जायकवाडी जलाशयाच्या भिंतीजवळ भगवानगड 43 गावांची योजना व या योजनेचे मुख्य जॅकवेल आणि जोडपूल एकत्र होणार आहे. पूर्वीची शेवगाव पाथर्डी योजनेतील उर्ध्व वाहिनी बदलून 19 किलो मिटरची 450 मिलिमीटर व्यासाची डी.आय. पाईपलाईन प्रस्तावित आहे.

https://youtu.be/m5yyfqkYqY4

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news