Pathaan Movie : पठाण ७०० कोटींच्या दिशेने, रेकॉर्डब्रेक कमाई सुरूच

Pathaan
Pathaan
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : पठाण चित्रपटाची दमदार कमाई सुरू आहे. (Pathaan Movie) पठाणचे ८ व्या दिवसाचे नेट कलेक्शन १८ कोटी रुपये असल्याचे म्हटले जात आहे. वर्ल्ड वाईड कलेक्शन बघता पठाणने ८ दिवसांत जगभरातील मार्केटमध्ये ६७५ कोटींची कमाई केली आहे. दुसऱ्या वीकेंडपर्यंत पठाण जगभरात ७०० कोटींचा व्यवसाय सहज करेल. (Pathaan Movie)

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा 'पठाण' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर करोडोंचा पाऊस पाडला आहे. हा चित्रपट सलग ८ व्या दिवशी नॉनस्टॉप कलेक्शन करत आहे. शाहरुखच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा चित्रपट ठरलेल्या पठाणचे ८ व्या दिवसाचे कलेक्शन आता समोर आले आहे. सुरुवातीच्या ट्रेंडनुसार पठाणने बुधवारीही दुहेरी अंकात कमाई करून इतिहास रचला आहे.
पठाणने ८ दिवसात किती कमाई केली?

व्यापार विश्लेषक रमेश बाला यांनी ८ व्या दिवशी ऑल इंडिया नेट कलेक्शन १८ कोटी रुपये होऊ शकते. शाहरुख-दीपिका स्टारर चित्रपटाचे ८ दिवसांचे भारतातील कलेक्शन ३४८.२५ कोटींवर गेले आहे. पठाणच्या हिंदी व्हर्जनने बुधवारी (पहिल्या दिवशी) ५५ कोटी, गुरुवारी ६८ कोटी, शुक्रवारी ३८ कोटी, शनिवारी ५१.५० कोटी, रविवारी ५८.५० कोटी, सोमवारी २५.५० कोटी, मंगळवारी २२ कोटींची कमाई केली. आता बुधवारीही चित्रपटाची ताकद कायम आहे. सातव्या दिवसाच्या तुलनेत कमाईमध्ये थोडीशी घट झाली आहे. असे असूनही पठाणचे कलेक्शन मजबूत आहे.

पठाण जगभरात ७०० कोटींचा गल्ला

ट्रेड अॅनालिस्ट रमेश बाला यांच्या म्हणण्यानुसार, पठाणने जगभरातील मार्केटमध्ये ८ दिवसांत ६७५ कोटींची कमाई केली आहे. दुसऱ्या वीकेंडपर्यंत पठाण जगभरात ७०० कोटींचा व्यवसाय सहज करेल. पठाण हा शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांच्या करिअरमधील सर्वात मोठा चित्रपट ठरला आहे. पठाणने शाहरुख खानच्या अनेक चित्रपटांच्या लाईफटाईम कलेक्शनला मागे टाकले आहे.

भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठा ओपनर चित्रपट ठरल्यानंतर पठाणने पहिल्या आठवड्याच्या कमाईसह विक्रम मोडला आहे. पठाण हा जगभरातील ६३४ च्या कमाईसह पहिल्या आठवड्यात सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट ठरला आहे. किंग खानचा हा चित्रपट ब्लॉकबस्टर आहे. पठाणमधील किंग खानने तो खऱ्या अर्थाने बॉक्स ऑफिसचा बादशहा असल्याचे सिद्ध केले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news