पुण्यातील कवठे येमाई परिसरात आकाशातून पडले’सुखोई’चे पार्ट

पुण्यातील कवठे येमाई परिसरात आकाशातून पडले’सुखोई’चे पार्ट

टाकळी हाजी : पुढारी वृत्तसेवा : कवठे येमाई (ता.शिरूर) गावच्या हद्दीत गांजेवाडी परिसरात आकाशात असलेल्या सुखोई विमानाचा ६०-७० फूट लांबीचा पाईप व मेटल पार्ट पडल्याची घटना मंगळवारी (दि.१७) घडली. अथक परिश्रम घेत शोध घेतला असता दुसऱ्या दिवशी (बुधवारी,दि.१८) सकाळी पोलीस पाटील गणेश पवार यांच्या कार्य तत्परतेने हे साहित्य सापडले. कवठे येमाई परीसरात पडलेला विमानाचा पाईप आणि मेटल पार्ट शोधण्यासाठी मंगळवारी वायुसेनेचे पथक आणि शिरूर पोलीस येथे दाखल झाले होते. सायंकाळी उशिरापर्यंत शोध मोहीम सुरू होती, अंधार पडल्याने व परिसरात बिबट्याची दहशत असल्याने शोध मोहीम थांबविण्यात आली.

संबंधित बातम्या :

बुधवारी (दि१८) सकाळी येथील पोलीस पाटील गणेश पवार हे त्यांच्या मुलाला बरोबर घेवून पाहणी करण्यास गेले आता त्यांना नदीच्या बाजूला निर्जन स्थळी हे साहित्य पडल्याचे दिसून आले. पवार यांनी तात्काळ शिरूर पोलिसांना कळविताच पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरिक्षक सुनिल उगले सहकाऱ्यांसह तिथे उपस्थित झाले. त्यानंतर हे साहित्य वायुसेनेच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले.'सोशल मीडिया'वर या घटनेची माहिती पसरल्याने स्थानिक नागरीकांनीही घटनास्थळी धाव घेत गर्दी केली होती.शोध मोहीमेमध्ये वायुसेना,शिरूर पोलीस आणि कवठे येमाई परिसरातील नागरिकांनी सहभाग घेतला.

निर्जन ठिकाणी हा भाग पडल्याने कोणतीही हानी झाली नाही. पोलीस पाटील गणेश पवार यांनी शोध घेण्यात महत्वाची भूमिका बजावल्याने त्यांचे परिसरातून कौतुक होत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news