Parliament Attack 2001 : शहिदांना राष्ट्रपती, पंतप्रधानांकडून श्रद्धांजली

पंतप्रधान मोदी यांनी संसद हल्ल्यातील शहिदांना  श्रद्धांजली
वाहिली
पंतप्रधान मोदी यांनी संसद हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली वाहिली

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

संसदेवर झालेल्या हल्ल्याला वीस वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह इतर मान्यवरांनी सोमवारी या हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली वाहिली. (Parliament Attack 2001) 13 डिसेंबर 2001 रोजी संसदेवर झालेल्या हल्ल्यात पोलिस, सुरक्षा रक्षकांसह 14 लोकांचा मृत्यू झाला होता. (Parliament Attack 2001)

लोकशाहीचे मंदिर वाचविण्यासाठी शहिदांनी दिलेले सर्वोच्च बलिदान देश कधीही विसरणार नाही, अशा शब्दांत राष्ट्रपती कोविंद यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. शहिदांनी दिलेले बलिदान प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देत राहील, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियाद्वारे सांगितले आहे. सैनिकांचे शौर्य आणि धाडसाला आपण नमन करतो, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटले आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी देखील शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली. संसद भवन परिसरात अनेक केंद्रीय मंत्री, खासदार तसेच इतर मान्यवरांनी शहिदांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहिली.

पाकिस्तानातून आलेल्या दहशतवाद्यांनी सुमारे चाळीस मिनिटे संसदेला ओलीस धरले होते. सुरक्षा रक्षक व पोलिसांनी प्राणाची बाजी लावून संसदेवरील हल्ला परतवून लावत पाचही दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news