पॅरिसमध्‍ये माथेफिरुचा रेल्‍वे स्‍टेशनवरील प्रवाशांवर चाकूहल्‍ला, सहाहून अधिक जण जखमी

संग्रहित छायाचित्र.
संग्रहित छायाचित्र.
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : फ्रान्‍सची राजधानी पॅरिस शहरातील मध्‍यवर्ती रेल्‍वे स्‍थानकावर आज ( दि. ११) माथेफिरुने अनेक प्रवाशांवर चाकूहल्‍ला करत दहशत माजवली. या संदर्भातील माहिती फ्रान्‍स रेल्‍वेच्‍या सूत्रांनी ट्विट करत दिली. या हल्‍लात सहाहून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत, असे वृत्त 'सीएएन'ने दिले आहे. दरम्‍यान, फ्रान्‍सचे गृहमंत्री गेरार्ड डरमॉनिन यांनीही या घटनेला दुजोरा दिला आहे.
(Paris knife attack )

आज सकाळी माथेफिरु रेल्‍वे स्‍थानकावर आला. त्‍याने दिसेल त्‍या प्रवाशाला चाकूने भोसकण्‍यास सुरुवात केली. या घटनेने एकच खळबळ माजली. चाकूहल्‍यात सहाजण जखमी झाल्‍याचे सांगण्‍यात येत असले तरी जखमींचा आकडा वाढण्‍याची भीती व्‍यक्‍त होत आहे.  या हल्‍ल्‍यानंतर रेल्‍वेसेवाही काही काळ विस्‍कळीत झाली होती. ( Paris knife attack )

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news