Parineeti-Raghav : राघव-परिणीतीची सुवर्ण मंदिराला भेट, नेटकरी म्हणाले, इतकी सिक्युरिटी कोण घेऊन येतं (Video)

राघव चड्ढा-परिणीती चोप्रा
राघव चड्ढा-परिणीती चोप्रा

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा खूप दिवसांपासून चर्चेत आहे. राघव चड्ढासोबत परिणीतीचे नाव जोडले गेल्यापासून ती लाईमलाईटमध्ये आहे. परिणीती पुन्हा राघव चड्ढासोबत स्पॉट झाली होती.  (Parineeti-Raghav ) दोघे पुन्हा एकदा अमृतसरमधील सुवर्ण मंदिर येथे दर्शनासाठी गेले. दोघांनी दर्शन घेतले. गोल्डन टेंपल येथील दोघांचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. (Parineeti-Raghav )

दोघेही टाईट सिक्युरिटीसोबत दर्शन करताना दिसले. खूप सारे सिक्युरिटी त्याच्या अवतीभोवतीला दिसले. त्यामुळे दोघेही ट्रोलर्सच्या निशाण्यावर आले. एक युजरने फोटोवर कमेंट करत लिहिलं आहे, 'हा कोणता नियम आहे. जेव्हा आम्ही गेलो होतो, तेव्हा, म्हटलं की, संपूर्ण डोकं दुपट्ट्याने झाकून घ्या आणि यांच्यासाठी सर्व माफ. आणखी एका युजरने लिहिले, 'परमेश्वराच्या दारीही शो ऑफ'. दुसऱ्या युजरने लिहिले, 'इतक्या सिक्युरिटीसोबत दर्शन करण्यासाठी कोण येतं'.

परिणीती चोप्राने आप युवा नेते राघव चड्ढासोबत साखरपुडा केला आहे. दोघांचा साखरपुडा आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news