Pansare murder case : पानसरे हत्‍या प्रकरणाचा तपास ‘एटीएस’कडे

Pansare murder case : पानसरे हत्‍या प्रकरणाचा तपास ‘एटीएस’कडे
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : ज्‍येष्‍ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्‍या हत्‍येचा तपास महाराष्‍ट्र दहशतवाद विराेधी पथककडे ( एटीएस ) सोपण्‍यात यावा, असा आदेश आज (दि. ३) उच्‍च न्‍यायालयाने दिला. या प्रकरणाचा तपास करणार्‍या 'एसआयटी'च्‍या अधिकार्‍यांनीही  'एटीएस'ला तपासकार्यात सहकार्य करावे, असेही  न्‍यायालयाने या वेळी स्‍पष्‍ट केले आहे. ( Pansare murder case )

तपास 'एटीएस'कडे साेपविण्‍यासाठी दाखल याचिकेवर सुनावणी

पानसरे हत्‍येचा तपास ( Pansare murder case ) सीआयडीच्‍या विशेष तपास पथक ( एसआयटी ) करत आहे. मात्र गेली सात वर्षांहून अधिक काळ झाला तरी मारेकरी हाती लागलेले नाहीत. यामुळे या प्रकरणाचा तपास 'एटीएस'कडे सोपविण्‍यात यावा, अशी मागणी असणारी याचिका पानसरे कुटुंबियांनी उच्‍च न्‍यायालयात दाखल केली होती.

यावर उच्‍च न्‍यायालयाच्‍या दोन सदस्‍यीय खंडपीठासमोर मंगळवारी सुनावणी झाली. यावेळी एटीएसकडे तपास सोपविण्‍यास आमची हरकत नाही, असे सीआयडीच्‍या वतीने ज्‍येष्‍ठ वकील अशोक मुंदरगी यांनी काल झालेल्‍या सुनावणीवेळी स्‍पष्‍ट केले हाेते. यानंतर आज पानसरे कुटुंबीयांची मागणी मान्‍य करत न्‍यायालयाने तपास एटीएसकडे वर्ग करण्‍याचा आदेश दिला.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news