पंढरपूर : विठ्ठल-रुक्मिणी मंदीरातील कर्मचा-यांना मास्क बंधनकारक

पंढरपूर विठ्ठल-रुक्मिणी
पंढरपूर विठ्ठल-रुक्मिणी

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा : चीनमध्ये वाढत असलेला कोरोनाच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर भारतात मास्कची सक्ती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात राज्य सरकारकडून अद्याप कोणत्याही मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आलेल्या नाहीत.

शिर्डी साईबाबा मंदिरात भाविकांना मास्कची सक्ती करण्यात आली आहे. त्याचा अनुषंगाने पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात देवस्थान समितीचे अध्यक्ष हरिभक्त पारायणकार गहिनीनाथ औसेकर महाराज व मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी तुषार ठोंबरे यांची बैठक पार पडली.

या बैठकीत मंदिरात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना मास्कची सक्ती करण्यात आली आहे. मात्र भाविकांना तशी कोणतीही सक्ती अद्यापही करण्यात आली नसली तरी मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या वयोवृद्ध नागरिकांनी मास्क लावावा असे आवाहन मंदीर समिमीकडून करण्यात आले आहे.

.हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news