Ashadhi wari 2023 : भवानी पेठेतील पालखी विठोबा आणि नाना पेठेतील निवडुंगा विठोबा मंदिर भाविकांच्या गर्दीने गजबजले

Ashadhi wari 2023 : भवानी पेठेतील पालखी विठोबा आणि नाना पेठेतील निवडुंगा विठोबा मंदिर भाविकांच्या गर्दीने गजबजले

पुणे : पुढारी वृत्तसेवा :   वेळेत वेळ काढून, माऊली-माऊलीचा जयघोष करीत पुणेकरांनी नाना पेठ आणि भवानी पेठ येथील निवडुंगा विठोबा आणि पालखी विठोबा मंदिरांमध्ये दर्शनासाठी मंगळवारी गर्दी केली होती. परिणामी, मंदिर परिसरामध्ये पुणेकर नागरिकांच्या लांबच-लांब रांगा पाहायला मिळाल्या. दरम्यान पालख्यांसोबत आलेल्या वारकऱ्यांनी पेठ परिसरात आपला मुक्काम ठोकला होता. त्यामुळे आणि ठिकठिकाणी लागलेल्या खेळण्याच्या दुकानांमुळे भवानी पेठ आणि नाना पेठेला यात्रेचे स्वरूप आले होते.

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या दोन्ही पालख्या मध्यवस्तीतील पेठांमध्ये मंगळवारी (दि13) पुण्यात मुक्कामी होत्या. त्यामुळे पुणेकरांनी दोन्ही ठिकाणी दर्शनासाठी गर्दी केली. दोन्ही मंदिरे आकर्षक विद्युत रोषणाईने आणि झेंडूच्या फुलांनी सजवण्यात आले होते. ज्येष्ठ तरुण चिमुकले कुटुंबीयांसह दर्शनासाठी आल्याचे पाहायला मिळाले.

दरम्यान , परिसरात काही अनुचित प्रकार घडू नये, याकरिता सीसीटीव्ही बसविण्यात आले होते. त्याचबरोबर परिसरात कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच, नागरिकांच्या सोयीसाठी पोलीस मदत कक्ष, मनपा मदत कक्ष उभारण्यात आले होते.
मंदिर परिसरात लागलेल्या पालखी रथांच्या बरोबर फोटो काढण्यासाठी देखील पुणेकरांनी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. अनेक जण आपल्या कुटुंबीयांसह पालखी रथासोबत आणि बैलजोडी सोबत फोटो काढताना दिसले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news