पुढारी ऑनलाईन डेस्क : पाकिस्तानमधील पहिल्या ट्रान्सजेंडर न्यूज अँकर मार्विया मलिक हिच्यावर शुक्रवारी ( दि. २५ ) जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. लाहौरमध्ये आपल्या घरी जात असताना हल्लेखोरांनी तिच्यावर अंदाधूंद गोळीबार केला. या हल्ल्यातून ती थोडक्यात बचावल्याचे सूत्रांनी सांगितले.
या हल्ल्याबाबत पोलिसांना मलिकने सांगितले की, पाकिस्तानमधील ट्रान्सजेंडर समुदायासाठी आवाज उठवल्याबद्दल मागील काही दिवसांपासून जीवे मारण्याच्या धमक्या मिळत होत्या. शुक्रवारी रात्री घरी जाताना हल्लेखोरांनी तिच्यावर अंदाधूंद गोळीबार केला. या जीवघेण्या हल्ल्यातून ती थोडक्यात बचावली. यानंतर तिने लाहोर सोडले असून मुलतानला गेल्याचे मलिक यांनी सांगितले.
शस्त्रक्रिया करुन नुकतीच मलिक ही आपल्या घरी आली होती. २०१८ मध्ये मलिकने आपल्या कुटुंबाचा त्याग केला. यानंतर ती टीव्हीवर न्यूज अँकर झाली होती. ती पाकिस्तानमधील पहिली ट्रान्सजेंडर न्यूज अँकर बनली होती. रिपोर्ट्सनुसार, पाकिस्तान फॅशन डिझाईन कौन्सिलद्वारे दरवर्षी आयोजित एका फॅशन शोमध्ये पहिली ट्रान्सजेंडर मॉडेल म्हणूनही तिने रॅम्पवॉक केले होते. २०१८ मध्ये यानंतर काही दिवसांनी तिने पाकिस्तानच्या कोहिनूर टीव्हीवर अँकर म्हणून काम सुरु केली. वयाच्या 21 व्या ती देशातील पहिली ट्रान्सजेंडर टेलिव्हिजन होस्ट बनली. त्यावेळी त्याला लोकांकडून "अतिशय" सकारात्मक प्रतिसाद मिळाला होता.
हेही वाचा :