Pakistan vs England 1st Test | इंग्लिश फलंदाजांनी पाकिस्तानी गोलंदाजांना धुतले, चार शतकांचा जोरावर उभा केला ६५७ धावांचा डोंगर

Pakistan vs England 1st Test | इंग्लिश फलंदाजांनी पाकिस्तानी गोलंदाजांना धुतले, चार शतकांचा जोरावर उभा केला ६५७ धावांचा डोंगर
Published on
Updated on

रावळपिंडी : इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात रावळपिंडी येथे सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात (Pakistan vs England 1st Test) इंग्लंडने धावांचा डोंगर रचला. इंग्लंडने सर्वबाद ६५७ धावा केल्या आहेत. इंग्लंडने पाकिस्तानात पाकिस्तानच्याच गोलंदाजांची पहिल्या दिवशी पिसे काढली होती. रावळपिंडी येथील पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडने ४ फलंदाजांच्या मोबदल्यात ५०६ धावा केल्या होत्या. आज खेळाचा दुसरा दिवस असून इंग्लंडचा डाव सर्वबाद ६५७ धावांवर आटोपला. पहिल्या दिवशी धावांचा पाऊस पाडल्यानंतर इंग्लंडने आज शुक्रवारी सकाळी अवघ्या दोन तासांत त्यांच्या शेवटच्या सहा विकेट गमावल्या. इंग्लंडची ही धावसंख्या आशियातील त्यांची आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या आहे.

इंग्लंडकडून पहिल्या तीन फलंदाजांनी शतकी खेळी केली. सलामीवीर झॅक क्राऊलीने १२२, बेन डकेट्सने १०७, ओली पोप १०८ धावांची खेळी केली. यानंतर पाचव्या क्रमांकावर हॅरी ब्रुक्सने १५३ धावांची खेळी केली. इंग्लंडकडून बाद झालेल्या फक्त जो रूटला शतकी खेळी करता आली नाही. तो २३ धावा करून बाद झाला.

इंग्लंड तब्बल १७ वर्षांनंतर पाकिस्तानमध्ये कसोटी सामना खेळत आहे. गुरुवारपासून पाकिस्तानातील रावळपिंडीमध्ये पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना सुरू झाला. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडचे ओली पोप, सलामीवीर झॅक क्राऊली आणि बेन डकेट्स यांनी पहिल्या ३५ षटकांतच २३३ धावांची सलामी दिली. जाहिद मोहम्मदने ही जोडी फोडली. त्याने बेन डकेट्सला १०७ बाद केले. त्यानंतर दुसरा शतक ठोकणारा सलामीवीर झॅक क्राऊली (१२२) देखील माघारी परतला. त्याचा हॅरिस रौफने त्रिफळा उडवला.

इंग्लंडचा स्टार फलंदाज जो रूट देखील २३ धावा करून बाद झाला. रूट बाद झाला त्यावेळी इंग्लंडच्या ३ बाद २८६ धावा होत्या. दरम्यान, ओली पोप आणि हॅरी ब्रुक्सने चौथ्या विकेटसाठी १७६ धावांची भागीदारी रचली. ओली पोपने १०८ धावांची शतकी खेळी केली. हॅरी ब्रुक्सने १५३ धावा कुटल्या. पाकिस्तानच्या जाहिद महमूदने ४, नसीम शाहने ३, मोहम्मद अलीने २ आणि हरिस रौफने १ विकेट घेतली. (Pakistan vs England 1st Test)

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news