Lahore blast : लाहोरमधील बॉम्‍बस्‍फोट: तीन ठार, २५ जखमी

पाकिस्‍तानमधील लाहोर शहर आज बॉम्‍बस्‍फोटाने हादरले. दुपारी शहरातील  प्रसिद्‍ध अनारकली मार्केटमधील पान मंडीत हा बॉम्‍बस्‍फोट झाला.
पाकिस्‍तानमधील लाहोर शहर आज बॉम्‍बस्‍फोटाने हादरले. दुपारी शहरातील प्रसिद्‍ध अनारकली मार्केटमधील पान मंडीत हा बॉम्‍बस्‍फोट झाला.
Published on
Updated on

लाहोर : पुढारी ऑनलाईन
पाकिस्‍तानमधील लाहोर शहर आज बॉम्‍बस्‍फोटाने हादरले. दुपारी शहरातील प्रसिद्‍ध अनारकली मार्केटमधील पान मंडीत हा बॉम्‍बस्‍फोट झाला. या स्‍फोटात एका मुलासह तीन जण ठार झाले आहेत.तर २५ जण जखमी आहेत. गंभीर जखमींची संख्‍या अधिक असल्‍याने मृतांची संख्‍या वाढवण्‍याची भीती व्‍यक्‍त होत आहे. बॉम्‍बस्‍फोटामुळे लोहारी गेट परिसरातील दुकाने आणि वाहनांचे नुकसान झाल्‍याच[ माहिती पाकिस्‍तानमधील डॉन वृत्तपत्राने दिली आहे.

स्‍फोटाच्‍या ठिकाणी दीड फूट मोठा खड्‍डा पडला होता. सर्व जखमींना मायो हॉस्‍पिटलमध्‍ये दाखल करण्‍यात आले आहे. लाहोरी गेट परिसर हा नेहमी गजबलेला असतो. घातपात की दुर्घटना याचा तपास सुरु आहे, अशी माहिती लाहोर पोलिसांनी दिली. अद्‍याप तरी या स्‍फोटाची जबाबदारी कोणत्‍याही दहशतवादी संघटनेने घेतलेली नाही.

हेही वाचलं का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news