पाकिस्तानात औषधांची तीव्र टंचाई; शस्त्रक्रिया रखडल्या – Pakistan Medicine Shortage

Medicines
Medicines

पुढारी ऑनलाईन : आर्थिक संकटात सापडलेल्या पाकिस्तानात औषधांचा मोठा तुडवडा निर्माण झाला आहे. यामुळे पाकिस्तानात डॉक्टर शस्त्रक्रिया पुढे ढकलत आहेत. पाकिस्तानात परकीय चलनात मोठी घट झाली असल्याने औषध निर्मितीसाठी लागणारे घटक आयात घटली असून त्यामुळे औषध निर्मिती थांबली आहे. (Pakistan Medicine Shortage)

शस्त्रक्रियेसाठी आवश्यक असलेली भूलीची औषधे उपलब्ध होत नसल्याने कॅन्सर, हृदयविकार आणि कॅन्सरसारख्या महत्त्वाच्या शस्त्रक्रियाही होऊ शकत नाहीत, अशी पाकिस्तानातील सध्याची स्थिती असल्याची बातमी पाकिस्तानातील स्थानिक वृत्तपत्रांनी दिली आहे. अशीच स्थिती कायम राहिली तर पाकिस्तानातील आरोग्य क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर नोकरकपात केली जाऊ शकते, आणि त्याचा फटका रुग्णांना बसेल असे इकॉनॉमिक टाइम्सने म्हटले आहे.

औषध निर्मिती निर्यातीवर अवलंबून  (Pakistan Medicine Shortage)

औषध उत्पादक कंपन्यांनी या स्थितीला वित्त व्यवस्थेला जबाबदार धरले आहे. व्यवसायिक बँका लेटर ऑफ क्रेडिट देत नसल्याने औषध निर्मितीसाठीचे आवश्यक घटक मागवता येत नाहीत, असे औषध उत्पादक कंपन्यांचे मत आहे. पाकिस्तानातील औषध निर्मिती ही आयातीवर अवलंबून आहे. औषध निर्मितीसाठी लागणारे ९५ टक्के घटक पाकिस्तानात आयात करावे लागतात. हे घटका भारत किंवा चीन अशा देशांतून आयात केले जातात. याशिवाय औषध निर्मीतीसाठीचा खर्चही विविध कारणांनी सातत्याने वाढत आहे. पाकिस्तानी चलनाचे अवमूल्यन झाल्याने इंधनाचे दर सातत्याने वाढत आहेत.

पाकिस्तान मेडिकल असोसिएशनने सरकारने परिस्थितीतून मार्ग काढावा असे म्हटले आहे. पाकिस्तानातील पंजाब प्रांतात सरकारने विविध रुग्णालयात पाहणी केली असून या पाहणीतल पॅनाडॉल, इन्सुलिन, ब्रुफेन, डिस्पिरीन, कॅलपॉल, टेगराल, बुस्कोपिन अशा विविध औषधांची मोठी कमतरता असल्याचे दिसून आले आहे. पाकिस्ताना फार्मसिटिकल मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनचे अध्यक्ष सईद फारूक बुखारी म्हणाले, "जर आताचे धोरण आणखी काही आठवडे सुरू राहिले तर पाकिस्तानात औषधांचा फार मोठा तुटवडा निर्माण होणार आहे."

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news