Pakistan economic crisis : दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेल्या पाकिस्तानला चीनची मोठी मदत | पुढारी

Pakistan economic crisis : दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेल्या पाकिस्तानला चीनची मोठी मदत

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर (Pakistan economic crisis) असलेल्या पाकिस्तानला चीनने दिलासा दिला आहे. डबघाईला आलेली अर्थव्यवस्था सावरण्यासाठी पाकने कर्जासाठी अनेक देशांकडे विनंती केली. मात्र, पाकिस्तानला मदत मिळत नव्हती. दरम्यान, शुक्रवारी चीनने पाकिस्तानची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी 700 दशलक्ष डॉलर्सची मदत दिली. अडचणीच्या वेळी ही मदत केल्याने पाकला काहीसा दिलासा मिळाला आहे. पाकिस्तानचे अर्थमंत्री इशाक दार यांनी चीनने 700 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स दिल्याची माहिती शुक्रवारी दिली.

दार यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, स्टेट बँक ऑफ पाकिस्तानला चायना डेव्हलपमेंट बँकेकडून $ 700 दशलक्ष निधी मिळाला (Pakistan economic crisis) आहे. या मदतीनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी या चीनचे आभार मानले आहेत. चीन हा पाकिस्तानचा मित्र आहे. आम्ही सर्वजण आयएमएफ (IMF) कराराची वाट पाहत होतो. पण त्याआधी चीनने मदत करून हे सिद्ध केले आहे की तो पाकिस्तानचा खरा मित्र आहे. या गोष्टी कधीच विसरता येणार नाहीत.

ते पुढे म्हणाले की, पाकिस्तान सरकार दिवाळखोरी टाळण्यासाठी सतत प्रयत्न करत आहे. आयएमएफकडून आर्थिक पॅकेज मिळविण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत. काही आठवड्यांपूर्वी 2.9 अब्ज अमेरिकन डॉलरच्या खालच्या पातळीवर गेलेला पाकिस्तानचा परकीय चलनाचा साठा आता 4 अब्ज डॉलरच्या जवळ गेला आहे.

हेही वाचा 

Back to top button