पाकिस्‍तान संघाला मोठा झटका, वर्षभर पगार नसल्‍याने मुख्‍य प्रशिक्षकाने दिला राजीनामा!

सिगफ्रीड एकमन. ( संग्रहित छायाचित्र )
सिगफ्रीड एकमन. ( संग्रहित छायाचित्र )
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क :  वर्षभर पगार मिळाला नसल्‍याने पाकिस्तान संघाचे डच हॉकी प्रशिक्षक सिगफ्रीड एकमन यांनी मुख्‍य प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला आहे. याची घोषणा त्‍यांनी सोशल मीडियाच्‍या माध्‍यमातून केली. यामुळे पाकिस्‍तान हॉकी फेडरेशनमधील आर्थिक अनागाेंदी  चव्‍हाट्यावर आली आहे. ( Pakistan Hockey Team )

सिगफ्रीड यांनी आपला राजीनामा पाकिस्तान हॉकी फेडरेशनकडे (PHF) पाठवला आहे. दरम्‍यान, आणखी एक डच प्रशिक्षक रोएलंट ओल्टमन्स हे पाकिस्‍तानात दाखल झाले आहेत. ते रविवारी आशिया ज्युनियर कपसाठी राष्ट्रीय ज्युनियर संघासोबत मस्कतला रवाना होणार असल्‍याचे सूत्रांनी सांगितले.

 Pakistan Hockey Team : पगार हाेण्‍याची वाट पाहात राहिले…

पगाराच्‍या वादावरुन सिगफ्रीड गेल्या वर्षी पाकिस्तानातून मायदेशी परतले होते. ते आपल्‍या पगाराबाबतच्‍या निर्णयाची वाट पाहत होते. अखेर याबाबत पाकिस्‍तान हॉकी फेडरेशनने कोणताही निर्णय घेतला नाही. त्‍यामुळे त्‍यांनी राजीनामा देण्‍याचा निर्णय घेतला.
सिगफ्रीड यांनी राजीनामा दिला आहे. नवे प्रशिक्षक ओल्टमन्स लाहोरला पोहोचले आहेत. मात्र ओल्टमन याचा पगार कोण देणार किंवा सिगफ्रीड यांची थकबाकी मंजूर केली जाणार का, याबाबत पाकिस्‍तान हाॅकी फेडरेशनने आपली भूमिका स्‍पष्‍ट केलेली नाही. निवडणूक आणि घटनात्मक मुद्यांवरून पाकिस्‍तान स्‍पोटर्स बोडाने हॉकी फेडरेशनला निधी देणे बंद केले आहे. त्‍यामुळे हाॅकी फेडरेशनसमाेरील आर्थिक संकट आणखी गडद झाल्‍याचे मानले जात आहे.

पैसे गोळा करून Pakistan Hockey Team ओमानला रवाना

आम्हाला ओमानमध्‍ये संघ पाठविण्‍यासाठी खासगी देणगीदार आणि प्रायोजकांद्वारे पैसे उभारावे लागले आहेत, असे पाकिस्‍तान हॉकी फेडरेशनच्‍या अधिकार्‍यांनी सांगितले.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news