Team India : टीम इंडियाचे मोठे नुकसान, ODI रँकिंगमध्ये ‘या’ स्थानी घसरण

Team India : टीम इंडियाचे मोठे नुकसान, ODI रँकिंगमध्ये ‘या’ स्थानी घसरण

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयसीसीने गुरुवारी (दि.11) ताजी वनडे क्रमवारी जाहीर केली. या क्रमवारीत भारतीय संघाला (Team India) मोठा फटका बसला असून एका स्थानाची घसरण झाली आहे. पाकिस्तानने भारताला मागे टाकत दुसरे स्थान पटकावले आहे. तर टीम इंडियाला तिसरा क्रमांक मिळाला आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत टीम इंडियाला (Team India) 2-1 असा पराभव पत्करावा लागला होता. याचा परिणाम क्रमवारीवर झाला असून टीम इंडियाला एक स्थान गमवावे लागले आहे. दरम्यान, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील रेटिंगमध्ये खूपच कमी अंतर आहे. ताज्या आकडेवारीनुसार ऑस्ट्रेलियाचे रेटिंग 113 वरून 118 वर गेले आहेत. पाकिस्तानचे 116 आणि भारताच्या खात्यात 115 रेटिंग आहेत. या अपडेटपूर्वी, ऑस्ट्रेलिया 113 गुणांसह अव्वल आणि भारत दुस-या स्थानी होता. तर पाकिस्तान तिसऱ्या क्रमांकावर होता.

पण न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या वनडे मालिकेत पाकिस्तानने 4-1 असा विजय मिळवून क्रमवारीत दुसरे स्थान पटकावले. याचबरोबर पाकपेक्षा एक गुण कमी असल्यामुळे भारतीय संघाची (Team India) तिसऱ्या क्रमांकावर घसरण झाली.

पाकिस्तानने प्रथमच 'हे' काम केले

न्यूझीलंडविरुद्धची वनडे मालिका सुरू होण्यापूर्वी पाकिस्तानचा संघ वनडे क्रमवारीत पाचव्या स्थानावर होता. मात्र, या मालिकेतील पहिले चार सामने जिंकून त्यांनी वनडे क्रमवारीच्या इतिहासात प्रथमच अव्वल स्थानी झेप घेतलली. पण पहिल्या क्रमांकाच्या खुर्चीवर त्यांना जास्त काळ बसता आले नाही. न्यूझीलंडविरुद्धची पाचवी वनडे गमावल्याने त्यांचे नुकसान झाले आणि ते दुसऱ्या स्थानी घसरले.

न्यूझीलंड (104 गुण) चौथ्या स्थानावर आहे. इंग्लंड 101 रेटींगसह 5 वे, द. आफ्रिका 6 वे आणि बांगलादेश 7 वे यांनी आपले स्थान कायम ठेवले आहे. अफगाणिस्तानने त्यांचे रेटिंग सुधारले आहे. तर श्रीलंका आणि वेस्ट इंडिजची त्यांच्या वनडे कामगिरीत घसरण झाली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news